चंदगड तालुक्यातील ३१ माध्यमिक शाळांना गुरुवारी २० रोजी ग्रंथदान : जीवन साळोखे यांचेकडून ७०० पुस्तकांची भेट
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
चंदगड तालुक्यातील ३१ माध्यमिक शाळांना गुरुवारी २० रोजी ग्रंथदान : जीवन साळोखे यांचेकडून ७०० पुस्तकांची भेट
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे चंदगड तालुक्यातील ३१ हायस्कूल्स व ज्युनियर काॅलेजीसना सातशे दर्जेदार, वाचनीय पुस्तकांची भेट देणार आहेत. गुरुवारी २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता, नवमहाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रमुख माजी आमदार राजेश पाटील यांचे हस्ते हा ग्रंथदान समारंभ चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाट्यावरील तुळसी हाॅल मध्ये होणार आहे.
दरम्यान, अशाप्रकारे ग्रंथदान समारंभ चंदगड तालुक्यात प्रथमच होत आहे. प्राचार्य जीवन साळोखे हे गेली वीस वर्षांपासून समृद्ध शालेय ग्रंथालय आणि वाचन प्रोत्साहनासाठी जिल्ह्यातील हायस्कूल्सना सातत्याने ग्रंथभेट देत आले आहेत. जिल्ह्य़ातील तीनशे हायस्कूल्स सह अनेक महाविद्यालये,विद्यार्थ्यी, शिक्षकांना त्यांनी यापूर्वी हजारो उपयुक्त, वाचनीय पुस्तके भेट दिली आहेत. ग्रंथदान उपक्रमांतर्गत ते ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन आणि प्रमुख तत्वे, विशेष दिन यांची माहिती देणारे लॅमिनेटेड फोटो सर्व संबंधित हायस्कूल्सना भेट देणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमास सर्व संबंधित हायस्कूल्सच्या मुख्याध्यापक व भाषेच्या अध्यापकानी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
