रजपुतवाडी येथील माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांचा विधानभवनास भेटीसह अभ्यास दौरा संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
रजपुतवाडी येथील माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांचा विधानभवनास भेटीसह अभ्यास दौरा संपन्न
आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची मिळाली संधी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
तांडा, वाडी, वस्त्यांच्या विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थ्यांनी प्रथमच विधान भवनाला भेट दिली. नामदार अतुल सावे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून पुणे विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळाली. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहिले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे’ हा संदेश दिला. त्यांचे शिक्षण आणि प्रगल्भता समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन आपल्या कुटुंबाची आणि राष्ट्राची प्रगती साधावी, हेच शासनाचे उद्दिष्ट आहे.
याआधी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. या संपूर्ण अनुभवातून त्यांना नवी प्रेरणा आणि शिक्षणाची दिशा मिळेल, याचा विश्वास आहे. शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे शिक्षणाचे दार सर्वांसाठी खुले करण्याचा प्रयत्न सुरूच राहील, असे प्रतिपादन नामदार अतुल सावे यांनी केले.
सदर भेटीसाठी नानासाहेब कदम यांचे मार्गदर्शन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणेचे उपसंचालक खुशाल गायकवाड, सहायक संचालक, कोल्हापूर सुनिता नेर्लीकर, अमित घवले, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, सुनील भोसले, प्राचार्य शिवाजीकोरवी, प्रशांत भोसले, निशिगंध नलवडे आदीसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
