विद्यार्थी व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी योग्य नियोजन आवश्यक : गटशिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
विद्यार्थी व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी योग्य नियोजन आवश्यक : गटशिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे
माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न
ज्ञानप्रतिनिधी प्रतिनिधी, गारगोटी
विद्यार्थी व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मुख्याध्यापकांनी योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे यांनी केले.
श्री.उदाजीराव डी. एड. कॉलेज, गारगोटी येथे माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन.एम.एम.एस. परीक्षेत भुदरगड तालुका राज्यात अव्वल ठरल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे यांचा सत्कार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे यांनी अध्ययन स्तर निश्चिती, आधार व्हॅलिडेशन, ड्रॉप बॉक्स झिरो करणे, इ. ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा कार्यवाही, शालेय पोषण आहार, सन २५/२६ साठी एन.एम.एम.एस. परीक्षा तयारी नियोजन, शाळा स्तरावरील शाळा स्तरावरील समित्यांचे एकत्रिकरण, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे संचालक निशिकांत चव्हाण, डॉ. ए. एम. पाटील यांच्यासह तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक मिलिंद पांगिरेकर यांनी तर आभार उपाध्यक्ष एस. के. कासार यांनी मानले.
गारगोटी : मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे यांचा सत्कार करताना मिलिंद पांगिरेकर सोबत सुरेश पाटील, निशिकांत चव्हाण, ए. एम. पाटील आदी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
