ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या छोट्या स्केटिंग खेळाडूंनी जंगलातील पानवटा केला स्वच्छ : पानवटा स्वच्छ होताच पावसाने लावली हजेरी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या छोट्या स्केटिंग खेळाडूंनी जंगलातील पानवटा केला स्वच्छ : पानवटा स्वच्छ होताच पावसाने लावली हजेरी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब व वन विभाग परिक्षेत्र गारगोटी यांच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पाणवटा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गारगोटी शिंदेवाडी जंगल हद्दीतील पाणवट्यांची स्वच्छता केली. पानवटा स्वच्छ होताच पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला. पानवटा स्वच्छता मोहीम यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट पसरली असून त्याचा परिणाम मनुष्यप्रमाणे वन्य प्राण्यावरती होत आहेत. पाण्याच्या शोधासाठी वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळताना दिसत आहेत. जंगलामध्ये नैसर्गिक पाणवटे आहेत पण सध्या उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की जंगलातील सर्व पानवटे आटलेले आहेत. त्याचबरोबर जंगल खात्याने देखील काही पानवटे तयार केले असून यामध्ये बरीच माती,पालापाचोळा साठलेला आहे. यापैकी गारगोटी शिंदेवाडी जंगल हद्दीतील पाणवट्यांची स्वच्छता ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या छोट्या स्केटिंग खेळाडू व पालकांबरोबर वन विभाग परिक्षेत्र गारगोटी यांच्या वतीने करण्यात आली. स्वच्छ झालेल्या पानवट्यामध्ये छोट्या स्केटिंग खेळाडू व पालकांच्या मदतीने बादली द्वारे पाणी पानवट्यामध्ये सोडण्यात आले. पाण्याची पहिली बादली पानवट्यामध्ये ओतताच वरून राजाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे स्वच्छ केलेल्या पानवट्यामध्ये पाणी साचणार आणि वन्य प्राण्यांना पाणी मिळणार असल्यामुळे सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला आणि पानवटा स्वच्छता मोहीम यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सायली मराठे, वनरक्षक आशिष चाळसकर, प्रशिक्षक इंद्रजीत मराठे उद्योजक रमेश पवार, प्राथमिक शिक्षक युवराज पाटील, वनमजूर हिंदुराव पाटील, वाहन चालक संजय गौड, फायर वॉचेर मनोज पवार, पालक मोहन बेलवेकर, स्केटिंग खेळाडू शिवन्या बेलवेकर, हर्ष पवार प्रज्ञेश वंजारी, गौरव पाटील गिर्यारोहक साम्राज्य मराठे या सर्वांनी स्वच्छता मोहिमेमुळे उत्साहाने सहभाग घेऊन एक चांगला उपक्रम जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राबवला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
