नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डॉ.तेजस्विनी देसाई लिखित दोन पुस्तकांचे सोमवार १२ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात प्रकाशन होणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

डॉ.तेजस्विनी देसाई लिखित दोन पुस्तकांचे सोमवार १२ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात प्रकाशन होणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

डॉ.तेजस्विनी देसाई लिखित दोन पुस्तकांचे सोमवार १२ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात प्रकाशन होणार

‘अग्निशिखा’ आणि ‘एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान’चे प्रकाशन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
लेखिका डॉ. तेजस्विनी देसाई लिखित ‘अग्निशिखा’ (भारतीय महिला वैज्ञानिक) आणि ‘एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता श्री.शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सदस्य, प्रेरक ललकारीच्या संपादक श्रीमती शारदा साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमकेएएल, पुणेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
‘अग्निशिखा’ या पुस्तकातून भारतीय महिला वैज्ञानिकांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि योगदानाचा परिचय करून देण्यात आला आहे. तर ‘एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान’ हे अनुवादित पुस्तक आहे. मूळ लेखक अनिल राजीमवाले यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. विज्ञान, साहित्य आणि सामाजिक जाणिवेचा संगम साधणारी ही पुस्तके वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.
या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी, विज्ञानप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन लेखिका डॉ. तेजस्विनी देसाई आणि लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबईचे प्राचार्य कॉ.आनंद मेणसे यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031