नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जीवन साळोखे यांच्या “महाराष्ट्राची नवरत्ने” या चरित्रसंग्रहाची शासनमान्य यादीत निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जीवन साळोखे यांच्या “महाराष्ट्राची नवरत्ने” या चरित्रसंग्रहाची शासनमान्य यादीत निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जीवन साळोखे यांच्या “महाराष्ट्राची नवरत्ने” या चरित्रसंग्रहाची शासनमान्य यादीत निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती, मुंबई यांनी २०२४ ची ग्रंथनिवड यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांच्या “भारतरत्न प्राप्त महाराष्ट्राची नवरत्ने” या चरित्र संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.
२०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या चरित्रसंग्रहात महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या भारतरत्न पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रातील नऊ थोर व्यक्तींच्या चरित्रांचा प्रवाही शैलीत समावेश करण्यात आला आहे. अभ्यासू वाचकांबरोबरच कुमार वाचकांना उपयुक्त ठरणाऱ्या या वाचनीय पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
यापूर्वी जीवन साळोखे यांच्या कविता शहराच्या,काटशह (कथासंग्रह), मी यशस्वी होणारच..!, पैलू प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, अस्वस्थ वळणावर, सोपे आहे आनंदाने जगणे, पालकांनो जागे व्हा, बुक नव्हे बुके.., नॉन स्टॉप हसा इ.पुस्तकांचा शासनमान्य पुस्तक यादीत समावेश झालेला आहे.
राज्यातील सर्व शासकीय अनुदानित सार्वजनिक वाचनालयांना दरवर्षी पुस्तके खरेदी करताना, शासनमान्य निवड यादीतील पुस्तके खरेदी करणे बंधनकारक असते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031