दूधगंगा विद्यालय कागल ची ॲथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग झेप
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
दूधगंगा विद्यालय कागल ची ॲथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग झेप
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
क्रीडा संकुल, बल्लापूर जि. चंद्रपूर याठिकाणी सोमवार ३० ऑक्टोबर ते मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत दूधगंगा विद्यालय, कागलचा विद्यार्थी कु.निखिल सुधाकर डिग्रजकर याने ४०० मी धावणे या विभागात द्वितीय क्रमांक मिळविला असून त्याची बिहार राज्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ॲथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारा निखिल हा विद्यालयाचा पहिलाच विद्यार्थी आहे.
कु.निखिल सुधाकर डिग्रजकर यास संस्थेचे सचिव श्री.अतुल जोशी यांची प्रेरणा, संस्थेचे विश्वस्त श्री.अमेय जोशी व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक बुगडे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक श्री.तानाजी पाटील, पुरंदर कांबळे, विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
