संत तुकाराम महाराजांनी मानवतावाद व समतावाद समाजापुढे मांडला : श्री.ज्ञानेश्वर बंडगर
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
संत तुकाराम महाराजांनी मानवतावाद व समतावाद समाजापुढे मांडला : श्री.ज्ञानेश्वर बंडगर

भारतरत्न डॉ.आंबेडकर व्याख्यानमाला : चौथे पुष्प
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
संत तुकाराम महाराज यांनी धर्म, वंश, जात, पंथ या पलीकडाचा मानवतावाद व समतावाद समाजापुढे मांडला आहे, असे उदगार श्री.ज्ञानेश्वर बंडगर (सांगोला) यांनी काढले.
श्री.शाहू वाचनालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना ‘तुका आकाशाएवढा’ या विषयावर श्री.ज्ञानेश्वर बंडगर (सांगोला) बोलत होते अध्यक्षस्थानी शाहू वाचनालयाचे अध्यक्ष, माजी आमदार श्री.बजरंग आ. देसाई (अण्णा) होते.
श्री.ज्ञानेश्वर बंडगर पुढे म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी सांप्रदायास अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त करून दिले असल्याने त्यांना रचियता म्हटले जाते व संत तुकाराम महाराज या सांप्रदायाचे कळस ठरले आहेत.
तुकाराम महाराजांना जीवनात अनेक संघर्षाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.
कोणत्याही जाती, धर्मात द्वेषाची भावना निर्माण न होता समभावाची भावना निर्माण झाली पाहिजे. स्त्री पुरुष भेद असता कामा नये. असा पुरोगामी, प्रागतिक विचार तुकाराम महाराजांनी मांडला. या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रातील महापुरुषांवर आणि समाजसुधारकांच्यावर राहिला.
संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभिजात अभंग रचनेमधून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले असून, मराठी भाषेला व साहित्याला सर्वश्रेष्ठ उंची प्राप्त करून देणारे ठरले आहेत. संत तुकाराम महाराजांची भाषा त्या काळातील समाजाला साजेशी होती.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री.सुभाष देसाई यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह श्री.टी.बी.पाटील यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





