राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूरतर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धेत गारगोटी येथील डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपला प्रथम क्रमांक मिळाला.
दि.१० व ११ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय काव्यमैफल करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गारगोटी येथील काव्यगंधा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या काव्यगंधा ग्रुपने (वैशाली माळी,डॉ. सुनंदा शेळके, डॉ. राजश्री पाटील) प्रथम क्रमांक पटकावला.
सरस्वतीची मूर्ती, प्रमाणपत्र आणि रु.१०,००० रोख असे पारितोषिकाचे स्वरूप असून राज्यभरातून आलेल्या एकसे बढकर एक बारा ग्रुपमधून काव्यगंधा ग्रुपने यश संपादन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
