नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सांस्कृतिक इतिहासातील ‘काव्यरसदा’ मूल्यात्मक साहित्यकृती : डॉ.श्रीपाल सबनीस : डॉ. कुलकर्णी लिखित ‘काव्यरसदा’ लेखसंग्रहाचे प्रकाशन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

सांस्कृतिक इतिहासातील ‘काव्यरसदा’ मूल्यात्मक साहित्यकृती : डॉ.श्रीपाल सबनीस : डॉ. कुलकर्णी लिखित ‘काव्यरसदा’ लेखसंग्रहाचे प्रकाशन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सांस्कृतिक इतिहासातील ‘काव्यरसदा’ मूल्यात्मक साहित्यकृती : डॉ.श्रीपाल सबनीस : डॉ. कुलकर्णी लिखित ‘काव्यरसदा’ लेखसंग्रहाचे प्रकाशन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
कवींची प्रतिभा, अभिव्यक्ती सामावून घेवून ‘काव्यरसदा’ हे पुस्तक म्हणजे साहित्य-सांस्कृतिक इतिहासातील मूल्यात्मक साहित्यकृती आहे, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी काढले.
पत्रकार भवन, पुणे येथे करम प्रतिष्ठानतर्फे डॉ. स्नेहल कुलकर्णी लिखित ‘काव्यरसदा’ या रसग्रहणलेख संग्रहाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. डॉ. बाबुल पठाण, शिरीष चिटणीस, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, डॉ. स्नेहल कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी शिल्पा चिटणीस, शुभानन चिंचकर, वर्षा कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, वैभव कुलकर्णी, आरती देवगांवकर, योगिनी जोशी, निरुपमा महाजन, रुपा पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. सबनीस म्हणाले, डॉ. कुलकर्णी यांनी केलेले रसग्रहण म्हणजे वाङमयीन संवाद आहे. सध्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील दूषित वातावरणात लेखिकेने प्रांजळ आणि शुद्ध भूमिकेने ‘काव्यरसदा’ची मांडणी केलीं येश आहे.
भूषण कटककर म्हणाले, नवीन पिढीने मराठी काव्यातील नेमके काय वाचायला हवे याची दिशा ‘काव्यरसदा’ हे पुस्तक दर्शवते.
काव्यातून वेगळेपण वि समाजासमोर पेरत असे शिरीष चिटणीस म्हणाले. निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031