नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी येथे २५ एप्रिल रोजी भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सोहळा संपन्न होणार : ​१९ साहित्यिकांचा होणार सन्मान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी येथे २५ एप्रिल रोजी भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सोहळा संपन्न होणार : ​१९ साहित्यिकांचा होणार सन्मान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी येथे २५ एप्रिल रोजी भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सोहळा संपन्न होणार : ​१९ साहित्यिकांचा होणार सन्मान

​ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील ‘शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शाहू वाचनालय’ आणि ‘अक्षरसागर साहित्य मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री. शाहू वाचनालय येथे पार पडणार आहे.
या ​कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री मा. नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी आमदार मा. श्री. बजरंग देसाई असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम लेखक प्रफुल्ल वानखेडे व भारतीय राजस्व सेवा सहआयुक्त कुलदीप राजे उपस्थित राहणार आहेत.
​या सोहळ्यात पिंपळगावचे एकनाथ पाटील यांना ‘भुदरगड साहित्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तसेच राज्यातील खालील साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी गौरविण्यात येणार आहे.
​संदीप वाकडे, पुणे (वाडा – कादंबरी),
​आसावरी इंगळे (चहा उकळतोय… देश सुधरेल? – संकीर्ण), ​बाळासाहेब खिलारे (पाण – कथासंग्रह), ​अयुब पठाण (अंगत पंगत – बालसाहित्य), ​संध्या लगड (पुसट सावल्या गडद काळ – कवितासंग्रह), ​संजय वारके (अंतरंग शब्दांचे – कथासंग्रह), ​डॉ. वर्षा फाटक (पाश – कथासंग्रह), ​उत्तम सदाकाळ (बोळातले भूत – बालसाहित्य),​अरविंदा भामरे (शापित कोलाहलाच्या नोंदी – कवितासंग्रह), ​शरद नवाळे (शेवंता – कादंबरी), ​विकास भावे (ओठावरली गाणी – संकीर्ण), ​बाबुराव कांबळे (निढळाच्या घामाच्या कविता – कवितासंग्रह), ​महानंदा मोहिते (घुंगुरमाळा – कवितासंग्रह), ​प्रतिक पवार (पुस्तकांना का घाबरतात माणसं…? – कवितासंग्रह), ​राजेश चौरे (जिद्द पेटताना – कादंबरी), ​अरविंद गाडेकर (मनातलं पानावर – संकीर्ण), ​गोपाल शिरपूरकर (भुईकोर – कथासंग्रह), ​राजेंद्र दिघे (पाखरांची गाणी – बालसाहित्य)
​डॉ. सविता शेट्टी (सारे काही तुझ्यासाठी – कवितासंग्रह)
​यावेळी संदीप मुसळे (चिमगाव) यांच्या ‘भोरकडी’ कथासंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील साहित्यिकांनी व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अक्षरसागर साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ. मा.ग.गुरव, उपाध्यक्ष डी.व्ही.कुंभार, सचिव बा.स.जठार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930