नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , “ध्येयवेड्या माणसांची ” लक्षवेधी कर्तृत्वगाथा…!! – डॉ. रघुनाथ मुडळे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

“ध्येयवेड्या माणसांची ” लक्षवेधी कर्तृत्वगाथा…!! – डॉ. रघुनाथ मुडळे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

“ध्येयवेड्या माणसांची ” लक्षवेधी कर्तृत्वगाथा…!!
– डॉ. रघुनाथ मुडळे

मराठी साहित्याच्या प्रांतात ‘व्यक्तिचित्र’ हा एक रंजक आणि वाचकाला खिळवून ठेवणारा प्रकार आहे. व्यक्तिचित्र लेखकांची एक फार मोठी परंपरा मराठीत आहे. त्याच परंपरेतील ध्येयाने प्रेरित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलखावेगळ्या ध्येयवेड्यांचा परिचय करून देणारे हे पुस्तक आहे . संजय वारके यांनी लिहिलेले’ ध्येयवेडी माणसं ‘, हे पुस्तक कोल्हापूरच्या नामवंत प्रकाशक अभिनंदन प्रकाशन संस्थेने हे नुकतेच समारंभपूर्वक प्रसिद्ध केले आहे.
पद, प्रतिष्ठा, धनलाभ आणि चंगळवादाच्या आजच्या दुनियादारीमध्ये एक आदर्शवत जीवन जगणारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ही व्यक्तिचित्रे आहेत. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन आपले आपले काम मनोभावे करणारी ही काही, व्यवहारी जगाच्या दृष्टीने वेडी माणसं आहेत…! मात्र खऱ्या अर्थानं ती सर्व ध्येयवेडी आहेत. त्यांनी आपापले इच्छित ध्येय गाठले आहे. प्रामाणिक कष्टाचा आनंद घेऊन समाधानाने जगणारी, उद्याच्या समाजासमोरचा आदर्श असणारी, मी समाजाचं काही देणं लागतो या भावनेने जगणारी ही माणसे आहेत. हे पुस्तक म्हणजे ध्येयाने वेड्या झालेल्या माणसांची यशोगाथाच आहे. या पुस्तकाला दिलेले ‘ ध्येयवेडी माणसं ‘ हे शीर्षक अगदी यथोचित आहे.
समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ माणसांना वाचकांसमोर आणणे, जी माणसं काम करतात; पण प्रसिद्धीपासून तशी दूर राहतात, मात्र ज्यांचा समाजघडणीत मोलाचा वाटा आहे; पण त्याचे श्रेय ते घेत नाहीत . अशा जगावेगळ्या माणसांना वाचकांसमोर आणण्यासाठीच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
या पुस्तकात दहा ध्येयवेड्या व्यक्तींचा वस्तुनिष्ठ परिचय करून दिलेला आहे. कात्रणांचा संग्रह करणारे, वाचनाची, हस्ताक्षराची आवड मुलांमध्ये निर्माण करून हस्ताक्षराचे दालन उभा करणारे उत्तम तळवार, ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते, अक्षरमित्र, पुरोगामी विचारांचे सच्चे पाईक बी. के. गोंडाळ, पुस्तके वाचली पाहिजेत, पालक , शिक्षकांनी ती विकत घेतली पाहिजेत असे सांगत “ग्रंथदान” हा विधायक उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये आणि वाचनालयातून, वाचन प्रोत्साहन आणि समृद्ध शालेय ग्रंथालयासाठी निरपेक्षपणे एकहाती, स्वखर्चाने वीस वर्षांहून अधिक काळ राबवणारे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे, गणिताची प्रयोगशाळा निर्माण करून गणितीय वस्तूंचा मोठा संग्रह करणारे डॉ. दीपक शेटे, रा.शाहू अध्यासनाची निर्मिती करणारे प्राचार्य डॉ. जे.के. पवार, पर्यावरण जनजागृती करणाऱ्या, प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. विदुला स्वामी, हरहुन्नरी कलाकार, बहुभाषिक शिवशाहीर डॉ. राजू राऊत, गिरणी कामगार असूनही वाचनाचा व्यासंग वाढवून ऐतिहासिक ग्रंथांची निर्मिती करणारे रमेश भिवरे, रुग्णसेवेचे व्रत हाती घेऊन निष्ठेने वैद्यकीय सेवा देणारे समाजिभिमुख दृष्टीने कार्यरत धन्वंतरी डॉ. डी. आर. नलवडे, ग्रंथांवर जिवापाड प्रेम करणारे, संपूर्ण जीवन ग्रंथांच्या सानिध्यात घालवणारे, “अक्षर दालन कोल्हापूरचे” निर्माते रवींद्रनाथ जोशी. अशा विविध क्षेत्रातील दहा ध्येयवेड्या माणसांचा परिचय यथोचितपणे या पुस्तकात करून दिला आहे.
तसं बघितलं तर मानवी मनाचा शोध घेणं ही अनंतकाळापासून चाललेली प्रक्रिया आहे . संवेदनशील मनांचा शोध घेणे ही जटील आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.अशा या गोष्टींचा शोध घेऊन त्यातून बोध देणं ही तशी सर्जनशीलतेच्या दृष्टीने आव्हानात्मक बाब आहे.मानवी मन हे स्वत:चं स्वत:ला फारसं आकलन होत नाही.अशावेळी दुस-या व्यक्तीच्या मनाचा शोध घेणं ही जटील गोष्ट असते. अशा गोष्टींचा,ध्येयवेड्या माणसांच्या रूपानं शोध घेऊन नव्या पिढीसाठी प्रेरक लेखन करणे, या मूळ हेतूने लेखकाने प्रयत्न केलेले दिसतात.
या पुस्तकातील भाषा ही साधी, प्रवाही, अतिशयोक्ती किंवा व्यक्तीस्तोम टाळून वास्तवावर भर देणारी, काळजाला भिडणारी आणि वाचकाला आपलीशी वाटणारी आहे. समोर ध्येय ठेवून वाटचाल केली की, आपण यशस्वी होतोच हे सांगणारे अर्थपूर्ण असे या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.
‘ देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.’ याप्रमाणे प्रत्येकाने समाजाला काहीतरी देऊ केले पाहिजे हा संदेश देणारे हे पुस्तक आहे. एखादी कला, छंद, आवड, ध्येय जवळ असेल तर नेहमीचे जीवन रंगतदार होते, समाधानी होते. हा संदेश देणारे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव – ध्येयवेडी माणसं.. लेखक – संजय वारके
प्रकाशक – अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर पृष्ठे – १२८ किंमत – ३२०/-₹
पुस्तक परिचय – डॉ. रघुनाथ मुडळे
शिवशाहू महाविद्यालय सरूड ता. शाहूवाडी जि.कोल्हापूर

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031