नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अनुदानाच्या वाढीव टप्प्याच्या मागणीसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा : अनुदान नाही तर मतदान नाही असा इशारा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

अनुदानाच्या वाढीव टप्प्याच्या मागणीसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा : अनुदान नाही तर मतदान नाही असा इशारा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अनुदानाच्या वाढीव टप्प्याच्या मागणीसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा : अनुदान नाही तर मतदान नाही असा इशारा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे अनुदान नाही तर मतदान नाही असा इशाराही देण्यात आला.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, दादासाहेब लाड, भरत रसाळे, कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे आदींच्या नेतृत्वाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयास मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सरकारने अनुदानाचा वाढीव टप्पा लवकर द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. माजी खासदार निवेदिता माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. शिक्षकांनी पावसात हा मोर्चा काढला. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी गेले काही दिवस कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. रोज वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन व सरकारचे लक्ष वेधले जात आहे. बुधवारी सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
वाढीव टप्प्याचा शासन आदेश त्वरित निर्गमित करावा, जीआरमध्ये प्रचलित निर्माण नुसार अनुदानाचा उल्लेख करावा, सरकार आहे मोठ्या मनाचे धोरण हवे अनुदान देण्याचे, अनुदान आमच्या हक्काचे, अनुदान नाही तर मतदान नाही असा इशारे देणारे फलक लक्ष वेधून घेत होते. शिक्षकांनी विविध मागण्यांचा उल्लेख असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. अनुदान घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात बी. जी बोराडे, डी.एस घुगरे, कृती समितीचे शिवाजी कुरणे, सुभाष खामकर, केदारी मगदूम, भानुदास गाडे, सावता माळी, राजू भोरे, सचिन कांबळे, उत्तम जाधव, प्रेमकुमार बिंदगे, प्रमोद पाटील, सचिन काळे, अनिल लायकर अरविंद पाटील हेमंत धनवडे, उदय पाटील, के.के.पाटील, गजानन काटकर आदी उपस्थित

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031