नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रशासकीय सुधारणा अभियानात पुणे विभागात भुदरगड गटशिक्षणाधिकारी कार्यालय द्वितीय : भुदरगडचा गौरव – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

प्रशासकीय सुधारणा अभियानात पुणे विभागात भुदरगड गटशिक्षणाधिकारी कार्यालय द्वितीय : भुदरगडचा गौरव

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रशासकीय सुधारणा अभियानात पुणे विभागात भुदरगड गटशिक्षणाधिकारी कार्यालय द्वितीय : भुदरगडचा गौरव

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा अभियानात विभाग स्तरावरील निवड प्रक्रियेत भुदरगड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. यामध्ये विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी काम करण्यात आले. त्यात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील गटशिक्षणाधिकारी
कार्यालयांचा सहभाग होता.
या अभियानात भुदरगड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवून, विशिष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. या शंभर दिवसांच्या अभियानात भुदरगड पंचायत समितीने आपले संकेतस्थळ विकसित करून, त्यावर शिक्षण विभागाच्या माहितीचे अद्ययावतीकरण केले. ही माहिती
सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. इयत्ता तिसरी आणि सहावी प्रज्ञाशोध परीक्षा, बीज संकलन स्पर्धा हे
नवोपक्रमण कार्यालयीन स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन, ई-ऑफिस कामकाज आणि कामकाजासाठी प्रसन्न वातावरणाच्या दृष्टीने कार्यालयाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
भुदरगड शिक्षण विभाग कार्यालयाने पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळवल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाने भुदरगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
………………
चौकट :
भुदरगड तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्रातील एक अग्रेसर तालुका आहे. महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजामध्ये सुद्धा कार्यालयातील कर्मचारी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे हे यश आम्ही संपादन करू शकलो आहोत.
– श्री.दीपक मेंगाणे, गटशिक्षणाधिकारी, राधानगरी भुदरगड

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30