माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी सौ.सुवर्णा सावंत : डॉ.आंबोकर यांच्याकडून स्वीकारला पदभार
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी सौ.सुवर्णा सावंत : डॉ.आंबोकर यांच्याकडून स्वीकारला पदभार
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ.सुवर्णा शिवाजी सावंत यांनी आज पदभार स्वीकारला. शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. डॉ. आंबोकर यांनी त्यांचे स्वागत केले.
कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांची शिक्षणाधिकारी (योजना) या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर सौ.सावंत यांची नियुक्ती झाली आहे.
सौ.सावंत या रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
सौ.सावंत या सन २००० ते २००६ पर्यत माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. २००६ ते २०१० साखरपा येथे विस्ताराधिकारी तर २०११ ते २०१५ कालावधीत त्यांनी रत्नागिरी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले. २०१५ पासून मेन राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे त्यांनी प्राचार्या म्हणून काम केले आहे. २०१७ ते २०१९ पर्यत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले. यावेळी त्यांनी कागल व गगनबावडा येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. विभागीय शिक्षण मंडळ, कोल्हापूरच्या सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिले आहे.
शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर अनुभव असलेल्या सौ.सुवर्णा सावंत यांची जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
