नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शालेय जिल्हास्तर रोलर स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचे यश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शालेय जिल्हास्तर रोलर स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचे यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शालेय जिल्हास्तर रोलर स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचे यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर व जयसिंगपूर येथे आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी रोड रेस व रिंक रेस प्रकरात मुले व मुलींच्या विविध वयोगटामध्ये यश संपादन केले.
स्केटिंग स्पर्धेतील विजेते खेळाडू असे –
रोड रेस स्केटिंग : ११ वर्षाखालील मुलींच्या गटात कु.जुवेरिया सुतार हिने रौप्य पदक, कु. श्रावणी पाटील हिने कास्य पदक तर मुलांच्या गटात कु.अफान सुतार याने कास्य पदक पटकावले.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात
कु.अनुश्री चोडणकर हिने कास्य पदक तर, मुलांच्या गटात कु.वरद सोरप याने सुवर्णपदक त्याबरोबर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु.धैर्यशील पारले याने २ रौप्यपदके व कु. यश दबडे याने कास्यपदक पटकावले.
रिंक रेस स्केटिंग प्रकारात (५०० आणि १००० मीटर : ११ वर्षाखालील मुलींच्या गटात कु.जुवेरिया सुतार हिने रौप्यपदक तर कु. श्रावणी पाटील हिने कास्यपदक पटकावले.१४ वर्षांखालील मुलींच्या गटात
कु.अनुश्री चोडणकर सुवर्णपदक व एक रौप्यपदक पटकावले. मुलांच्या गटात
कु. वरद सोरप याने दोन सुवर्ण पदके तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. धैर्यशील पारले याने २ रौप्यपदके तर कु. यश दबडे याने कास्य पदक मिळवले. याबरोबर सिद्धांत पाटील, आर्यन निंबाळकर, प्रज्ञेश वंजारे, मैथिली पाटील, तनिष्का मोरे, आराध्या चौगले यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या विजेत्या खेळाडूंची १९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना प्रशिक्षक इंद्रजीत मराठे, सत्यजित मराठे यांचे मार्गदर्शन तर क्लबचे अध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, पालक विठ्ठल पाटील, फिरोज सुतार, उदय चोडणकर, महेश सोरप, पारळे, दीपाली मोरे, अनिल निबाळकर,संतोष पोवार, वनिता पाटील, शशिकांत पाटील यांचे प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली. या स्पर्धेचे उदघाटन कोल्हापूर जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अँड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, महानगरपालिका क्रीडा अधिकारी पांडव सर स्केटिंग असोसिएशनचे जिल्हा सचिव महेश कदम, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सायली मराठे, जिल्हातील स्केटिंग प्रशिक्षक, शाळाचे क्रीडा शिक्षक, पालक त्याचबरोबर मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर स्पर्धा कोल्हापूर जिल्हा स्केटिंग संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने घेण्यात आल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031