नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *वर्ल्ड फॉर नेचर संस्थेमार्फत वन्यजीव सप्ताहात भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, कॉलेजेस मधील १७०० जणांचे प्रबोधन* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*वर्ल्ड फॉर नेचर संस्थेमार्फत वन्यजीव सप्ताहात भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, कॉलेजेस मधील १७०० जणांचे प्रबोधन*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*वर्ल्ड फॉर नेचर संस्थेमार्फत वन्यजीव सप्ताहात भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, कॉलेजेस मधील १७०० जणांचे प्रबोधन*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
‘वर्ल्ड फॉर नेचर’ यां संस्था वन्यजीव संरक्षण व समाजात निसर्ग संवर्धनासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत आहे. आज शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग, वन्यजीव व जैवविविधतेची ओळख व्हावी व त्यांच्या मनात निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी वन्यजीव सप्ताह काळात जवळपास १७०० लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वर्ल्ड फॉर संस्थेने यशस्वी कार्यशाळा घेतल्या. 
वास्तविक निसर्गाचे संवर्धन व वन्यजीवांचे जतन ही आज काळाची गरज बनलेली आहे. आपण निसर्गाला व वन्यजीवांना जपले तर निसर्ग अबाधित राहून आपल्याला जपेल. वन्यजीव सप्ताहात कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, कॉलेजे मध्ये प्रबोधनपर कार्यशाळा घेतल्या. त्यामध्ये चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाड्यावर व भुदरगड तालुक्यातील मेघोली पैकी धनगरवाड्यावर अबालवृद्धांसह १०० गावकऱ्यांना सर्पजागृती व वन्यजीवांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना या महत्वाच्या विषयावर सर्व  मार्गदर्शन करण्यात आले.
चंदगड तालुक्यातील सह्याद्री विद्यालय हेरे व श्रीराम विद्यालय कोवाड, याठिकाणी २०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. जयप्रकाश विद्यालय, किणी येथे २०० विद्यार्थी व गावातील लोकांसाठी “जैवसाखळी व वन्यजीवांची भूमिका” या विषयावर प्रबोधनपर कार्यशाळा घेण्यात आली. श्री.व्ही.के.सी.पी.विद्यालय कागणी, मराठी विद्यामंदिर कागणी, मराठी विद्यामंदिर राजगोळी बुद्रुक, श्री दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक या चार शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव, शंकर चक्रू पाटील हायस्कूल, दिंडेवाडी, रांगणा पब्लिक स्कूल कडगाव या तीन शाळांमधील ३०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा व “जैवसाखळी व वन्यजीवांची भूमिका” या विषयावर कार्यशाळा घेतली.
आजरा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा गवसे, विद्यामंदिर देवर्डे व पंडित दिनदयाळ हायस्कूल आजरा या तीन शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
     वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटाला लागून असलेल्या आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यातील खेड्यापाड्यातल्या, वाड्यावस्त्यावरील, डोंगराळ भागात जाऊन याठिकाणी सर्पजनजागृती, वन्यजीव संरक्षण व वन्यजीवांची निसर्गातील भूमिका या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031