नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘ग्यान की लायब्ररी’ उपक्रमांत ५,८०० शाळात वाचनालये सुरु : वाचन उपक्रमाशी जोडले १३ लाख विद्यार्थी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘ग्यान की लायब्ररी’ उपक्रमांत ५,८०० शाळात वाचनालये सुरु : वाचन उपक्रमाशी जोडले १३ लाख विद्यार्थी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

‘ग्यान की लायब्ररी’ उपक्रमांत ५,८०० शाळात वाचनालये सुरु : वाचन उपक्रमाशी जोडले १३ लाख विद्यार्थी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
‘ग्यान की लायब्ररी’ उपक्रमांतर्गत आज देशभर ५,८०० गावांमधील शाळांत वाचनालये सुरु झाली असून त्यातील ४९०० वाचनालये महाराष्ट्रात आहेत. १३ लाख विद्यार्थी या वाचन उपक्रमाशी जोडले असून त्यातील ३ लाख ७३ हजार मुलांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल लेखी अभिप्रायही दिला आहे. १२ वर्षांपूर्वी एका छोट्या गावातून सुरु झालेल्या ‘ग्यान की लायब्ररी’ उपक्रमाने आता मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे.
व्यवसायानिमित्त ग्रामीण भागांत फिरत असताना प्रदीप लोखंडे यांना तेथील गावागावांत क्रमिक पुस्तकांशिवाय अन्य पुस्तकांचा दुष्काळ असलेल्या शाळा आणि वाचनासाठी आसुसलेली मुले दिसली. त्यानंतर प्रादेशिक भाषा जिवंत राहणार का? अशी केवळ कोरडी चिंता न करता ज्या वयात सर्वाधिक कौशल्ये मिळवली जातात, त्या ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी प्रादेशिक भाषांत ग्रंथालये सुरू करायचे ठरवले. या उपक्रमात दोन हजार ते आठ हजार लोकसंख्येचे गाव निवडले जाते. साधारण ३५० घरे असलेल्या गावात १७० ते २५० शाळकरी मुले असतात. गावातील शाळेने आम्हाला ग्रंथालय हवे आहे, असे पत्र द्यावयाचे असते. त्यानंतर संबंधित शिक्षक, पालक, मुले यांच्याशी संपर्क केला जातो. मुलांसाठी पुस्तक भेट देऊ इच्छिणाऱ्या दात्यांकडून १४८ ते १८४ पुस्तकांचा संच शाळेस भेट दिला जातो. पारदर्शक हँगरमध्ये पुस्तके ठेवली जातात. कुणालाही कोणतेही निवडता येते. या उपक्रमात ९४ टक्क्यांहून अधिक पुस्तकदाते महिला आहेत.
शाळांमध्ये ‘ग्यान की लायब्ररी’ सुरु करण्याआधी वाचनालयाचा वापर व्यवस्थित झाला नाही तर पुस्तके परत घेतली जातील. असे मुख्याध्यापकांकडून लिहून घेतले जाते. आतापर्यंत १३ शाळांवर अशी कठोर कारवाई झालेली आहे. प्रत्येक पुस्तकात एक जोडकार्ड ठेवलेले असते. त्यावर दात्याचा किंवा एखाद्या क्षेत्रातील मान्यवराचा पत्ता आधीच लिहिलेला असतो. मुलांनी पुस्तक वाचून त्या पुस्तकाबद्दलचा अभिप्राय कळवायचा असतो. मोठे साहित्यिक, उद्योजक, खेळाडू यांना मुले पुस्तकाबद्दल कळवतात. पुष्कळदा ही मंडळी मुलांना उत्तरही पाठवतात. मुकेश अंबानी, सचिन पायलट अशा अनेक दिग्गजांनी आतापर्यंत मुलांना उत्तरे लिहिली आहेत. मुलांना याचे अप्रूप वाटते आणि ती आपसूक पुस्तकांशी जोडलेली राहतात.
पुस्तकांच्या हँगरमध्ये एक कप्पा रिकामा ठेवतात. त्या कप्प्यात मुलांनी, त्यांच्या पालकांनी वाढदिवशी पुस्तके भेट म्हणून ठेवायची असतात. खाऊ वाटण्यापेक्षा आपले नाव लिहून पुस्तक देणे मुलांना आवडते. हा कप्पा बघताबघता भरून जातो.
…………………………………..
*’ग्यान की’च्या माध्यमातून वाचनाबद्दल सकारात्मकता वाढली : प्रदीप लोखंडे*

वाचन संस्कृतीचा ऱ्हास करून नकारात्मकता पसरवणारे लोक आजूबाजूला आहेत. पण वाचनाचे वेड वाढते आहे, असे म्हणणे सातत्याने मांडणारी ९४ हजार कार्यकत्यांची साखळी तयार करायची आहे. त्यातून वाचनाबद्दलची सकारात्मकता वाढेल, याची खात्री वाटते.
– प्रदीप लोखंडे, ‘ग्यान की लायब्ररी’ चळवळ
…………………………………..

Gyan-key वाचनालयाशी जोडली गेल्यामुळे पुस्तकांशी जास्त मैत्री झाली. आजपर्यंत मी चार पुस्तके लिहिली आहेत. तसेच अमेरिकेतील एक संस्थेशीही जोडली गेली आहे. एका छोट्या खेड्यात राहणारी मुलगी हे करू शकते म्हणजे कोणत्याही शाळेतील विद्यार्थीही हे नक्कीच करू शकतात.
– स्वप्नाली भराटे (Mo.8446262326)
…………………………………
*पोलिस ठाण्यांत वाचनालय : रिक्षावाल्यांनाही पुस्तके*
‘ग्यान की कडून हैदराबाद आणि नाशिक शहरांतील पोलिस ठाण्यांमध्ये वाचनालये उघडण्यात आली आहेत. पिस्तुल, काठी हातात घेणारे पोलिस पुस्तके हाताळतात, वाचतात, असे चित्र आता या शहरांत दिसू लागले आहे. पुण्यात १८ हजार रिक्षावाल्यांना पुस्तके देण्यात आली तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये वाचनालये सुरू झाली आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930