नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सामाजिक सलोखा कायम ठेवणे ही शाहू महाराजांना आदरांजली : श्री.टी.बी.पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

सामाजिक सलोखा कायम ठेवणे ही शाहू महाराजांना आदरांजली : श्री.टी.बी.पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सामाजिक सलोखा कायम ठेवणे ही शाहू महाराजांना आदरांजली : श्री.टी.बी.पाटील

गारगोटी हायस्कूलमध्ये छ.शाहू जयंती साजरी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
सामाजिक सलोखा कायम ठेवणे हिच छ. शाहू महाराजांना आदरांजली ठरेल, असे उदगार श्री.शाहू वाचनालयाचे कार्यवाह श्री.टी.बी.पाटील यांनी काढले.
गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे छ.शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात प्रमुख वक्ते म्हणून श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
यावेळी बोलताना श्री.शाहू वाचनालयाचे कार्यवाह श्री.टी. बी. पाटील म्हणाले, छ. शाहू महाराजांनी शिक्षणाला महत्व देऊन प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. मंदिरातील पैसा शाळेसाठी दिला. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु केली. आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी कु.ऋतुजा फराक्टे, साबिर पठाण, ऋग्वेद कुंभार, जान्हवी आरते , चेतनराज देसाई, अथर्व केळुस्कर, श्रीनिधी पाटील, पार्थ कामत, राजेश्वरी देसाई, ओम मुदाळकर ज्ञानेश्वरी जाधव, विभावरी पोवार, राजनंदिनी शिंदे, कार्तिकी पाटील, तस्मिया बागवान, भक्ती कांबळे, अवधूत देसाई, अथर्व पाटील आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी जी डी. ठाकूर, एस. एस. नाईक, आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, बी. के. इंगळे, श्रीमती आर. आर. बहादुरे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, श्रीमती मेघा चव्हाण पाटील, सौ.राजवी साठे, ऋषिकेश गव्हाणकर, अमृत देसाई, प्रा.सौ.स्मिता पाटील, प्रा.सौ.तृप्ती पाटील, प्रा.सौ. रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रारंभी छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आभार डी.जी. लकमले यांनी तर सूत्रसंचालन युवराज शिगावकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930