नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आम.श्री.नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक EVM मशीनवर घेवून विद्यार्थ्यांना दिला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावण्याचा अनुभव – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आम.श्री.नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक EVM मशीनवर घेवून विद्यार्थ्यांना दिला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावण्याचा अनुभव

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आम.श्री.नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक EVM मशीनवर घेवून विद्यार्थ्यांना दिला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावण्याचा अनुभव

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कसबा वाळवे
आम.श्री.नामदेवराव भोईटे माध्य. विद्यालय, कसबा वाळवे (ता. राधानगरी) या विद्यालयातील शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक EVM मशीनवर घेवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावण्याचा अनुभव देण्यात आला.
शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेत असताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया कशी घेतली जाते याचा अनुभव देण्यात आला. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना विद्यार्थ्यांच्या उमेदवार नामनिर्देश अर्जापासून ते माघार अर्ज, चिन्हाचे वाटप, प्रचार व त्यानंतर मोबाईल वर EVM मशीन चे app डाउनलोड करून नाव व चिन्हा समोरील बटण दाबून त्या app मध्ये बिप असा आवाज झाल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या मताची नोंद झाल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश संकपाळ यांनी काम पहिले तर केंद्राध्यक्ष म्हणून सौ. सुमित्रा भोईटे, मतदान अधिकारी 1, 2 व 3 म्हणून इ. 9 वी च्या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रीती खोत, वैष्णवी पाटील, पोवार यांनी काम पाहिले.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्री. सुनिल संकपाळ, श्री. रवी भांदीगरे, श्री. बाजीराव सुतार, श्री. संदिप पताडे, सौ. उज्वला भगत, श्री. दत्ताजीराव मगदूम, सौ. राणी लोकरे, कु. सुजाता भांदीगरे, श्री. धैर्यशील पाटील व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी अनमोल सहकार्य केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930