ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंची विभागीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंची विभागीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तथा जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय शासकीय जिल्हास्तरीय स्केटिंग क्रीडा स्पर्धा कोल्हापूर व जयसिंगपूर या ठिकाणी रोड रेस व रिंग रेस प्रकारामध्ये घेण्यात आल्या.
दि. 11, 14, 17 व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या गटांच्या क्वॉड व इनलाईन स्केटिंग प्रकारामध्ये घेण्यात आल्या. सदर स्पर्धा कोल्हापूर जिल्हास्तर, कोल्हापूर शहर व इचलकरंजी महानगरपालिकास्तर अशा घेण्यात आल्यात. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील विविध शाळांचे सुमारे 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी विविध गटामध्ये पदके मिळवली. या सर्व विद्यार्थ्यांची निवड 17 ऑक्टोंबर 2024 रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धेसाठी झाली आहे.
पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे
11 वर्षाखालील गट : राही जितकर – एक सुवर्ण, रसिका हुल्ले – एक सुवर्ण – एक रौप्य, श्रावणी पाटील – दोन कास्य, तनिष्का हवलदार – एक कास्य, विराट सुतार – दोन रौप्य एक कास्य, साईराज मोरबाळे – एक कास्य
14 वर्षाखालील गट : वरद सोरप दोन सुवर्ण एक रौप्य, यश दबडे एक सुवर्ण दोन रौप्य
17 वर्षाखालील गट : धैर्यशील पारळे दोन रौप्य एक कास्य
19 वर्षाखाली गट : रणवीर भारमल याने तीन सुवर्णपदके मिळवली.
या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा ॲम्युचर रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आल्या यावेळी क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष महेश कदम, पत्रकार सायली मराठे, विविध शाळातील क्रीडा शिक्षक, मोठ्या संख्येने खेळाडू त्याच बरोबर पालक उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक इंद्रजित मराठे, सत्यजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, पालक मारुती पारळे, अमित हावलदार, महेश सोरप, सागर मोरबाळे, विनायक सुतार, विठ्ठल पाटील, सुनील भारमल, सरीता दबडे, रोहण हुल्ले, गणेश तोडकर यांचे प्रोत्साहन मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
