ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा खेळाडू यश दबडे याची राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा खेळाडू यश दबडे याची राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
विरार (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय इंडोरेन्स स्केटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचा स्केटिंग खेळाडू यश शशिकांत दबडे याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटांत टाईम ट्रायल प्रकारात कास्यपदक मिळवले. ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी खोपोली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाले आहे.
यश दबडे हा मुरगुड विद्यालय, मुरगुड येथे आठवीच्या वर्गात शिकत असून तो वयाचा चौथ्या वर्षापासून स्केटिंग करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक स्केटिंग स्पर्धेत पदके मिळवली आहेत.
त्याला स्केटिंग प्रशिक्षक श्री.इंद्रजीत मराठे, सत्यजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. असून त्याची आई सुरेखा दबडे यांची प्रेरणा तर संस्थाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
