सेवानिवृत्तीची तपपूर्ती आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २० महाविद्यालये व वाचनालयांना “लाखमोलाची” ग्रंथसंपदा भेट
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सेवानिवृत्तीची तपपूर्ती आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २० महाविद्यालये व वाचनालयांना “लाखमोलाची” ग्रंथसंपदा भेट
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे अनोखे, कृतज्ञतापूर्वक अभिवादन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी गारगोटी
सेवानिवृत्तीची तपपूर्ती आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक जीवन साळोखे हे आपल्या दोन दशकाच्या “ग्रंथदान उपक्रमांतर्गत” कागल, भुदरगड, राधानगरी, आजरा, करवीर या तालुक्यातील २० महाविद्यालये व वाचनालयांना “लाखमोलाची” साडेपाचशेहे दर्जेदार पुस्तके समारंभपूर्वक वितरण करणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतील अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेत हा “ग्रंथदान समारंभ” होणार आहे. श्री.मौनी विद्यापीठ संचलित कर्मवीर हिरे महाविद्यालयाने याचे नेटके संयोजन केले असून, “कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्राचा ग्रंथालयात वापर” या महत्त्वपूर्ण विषयावरील कार्यशाळेत lडॉ. अतुल नगरकर हे मार्गदर्शन करणार आहेत तर, श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) हे अध्यक्ष आहेत, अशी माहिती कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.उदय शिंदे यांनी दिली.
या संयुक्त कार्यक्रमास विद्यापीठाचे संचालक डॉ.पी.बी.पाटील, राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूरचे डॉ.जे के पवार, प्राचार्य डाॅ.टी एम पाटील, भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, विद्यापीठाचे कर्मचारी प्रतिनिधी डॉ.अरविंद चौगले, शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, प्रबंधक अरविंद देसाई हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळा आणि ग्रंथदान कार्यक्रम हिरे महाविद्यालयाच्या डॉ.जे.पी. नाईक सभागृहात बुधवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वा.आहे.
या कार्यशाळा आणि ग्रंथदान उपक्रमात सहभागी महाविद्यालये अशी- कागल तालुक्यातील देवचंद काॅलेज, अर्जुननगर, डी.आर.माने काॅलेज, कागल, दूधसाखर , बिद्री, मंडलिक काॅलेज, मुरगूड,मेजर घाटगे काॅलेज, कापशी, भुदरगड तालुक्यातील कर्मवीर हिरे काॅलेज,गारगोटी, आनंदराव आबिटकर काॅलेज, कडगाव, राधानगरी महाविद्यालय,राधानगरी, यशवंतराव पाटील काॅलेज, सोळांकूर, पार्वतीबाई महिला काॅलेज, सरवडे, जिजामाता काॅलेज,पडसाळी- दुर्गमानवड, व्यंकटराव काॅलेज, आजरा, आजरा महाविद्यालय, आजरा, भोगावती काॅलेज, कुरुकली , शहाजी महाविद्यालय, कोल्हापूर, ग.गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा, शाहू वाचनालय, गारगोटी इत्यादींचा समावेश आहे.
दरम्यान, प्राचार्य जीवन साळोखे यांनी २०२५ या वर्षात शंभर शाळा-महाविद्यालये, वाचनालयांना दोन हजार पुस्तके ग्रंथदान उपक्रमांतर्गत देण्याचे जाहीर केले होते. या कार्यक्रमात त्यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे.
यावेळी कर्मवीर हिरे काॅलेजचे ग्रंथपाल प्रा. शैलेश गुंड, समन्वयक प्रा.पी.पी.डांगे हे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
