गारगोटी हायस्कूलचा १० वीचा निकाल ९९.२० टक्के : कु.सिद्धेश देसाई प्रथम
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूलचा १० वीचा निकाल ९९.२० टक्के : कु.सिद्धेश देसाई प्रथम
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१० वीचा निकाल ९९.२० टक्के लागला असून कु.सिद्धेश संभाजीराव देसाई याने ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकवला.
शाळेत गुणानुक्रमांक असे कु.सिद्धेश संभाजीराव देसाई (९४ टक्के) – प्रथम, कु.श्रद्धा नितीन सारंग (९३.८०) – द्वितीय, कु.प्रियांका सर्जेराव देसाई (९१.४०) – तृतीय, कु.विभावरी विजय पोवार (९१.२०) – चौथा, कु.आयुषी रविराज पाटील (९०.४०) – पाचवा, कु.तन्मय संजय कांबळे (९०.४०) – पाचवा
शाळेतून १२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण तर ५५ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर, वर्गशिक्षक श्री.जी.डी.ठाकूर, श्री.एस.एस.नाईक, श्री.आर. पी. गव्हाणकर, श्री.डी.जी.लकमले, श्री.बी. ए. डावरे, श्री.पी.पी.भंडारी, सौ.सुजाता पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
