निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव, तुकारामच्या जयघोषाने कागल शहर झाले भक्तीमय
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव, तुकारामच्या जयघोषाने कागल शहर झाले भक्तीमय

दूधगंगा विद्यालयाची आषाढी वारकरी दिंडी म्हणजे संस्कृतीची जोपासना याचा आदर्श उपक्रम
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल या विद्यालयाने आज आषाढी एकादशी निमित्त कागल शहरातून मोठ्या उत्साहात दिंडीचे आयोजन केले. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने आणि पारंपरिक वेशभूषेने सजलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तीमय करून टाकला.
सकाळी ८ वाजता कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल चे विश्वस्त अमेय जोशी, गौतम गाडेकर, आनंदराव पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखी चे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. यावेळी पांडूरंग पारदोळे, प्रकाश कदम, शिवाजी दावणे, हरी पाटील, अकबर नायकवडी व अनेक पालक उपस्थित होते .
या आषाढी वारकरी दिंडी मध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसनसो मुश्रीफ, संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी साहेब, चंद्रकांत गवळी, तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी यांनी सहभाग घेतला.
यावेळी कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल या संस्थेच्या शिक्षण संकुलातील अंगणवाडी, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पांढरे शुभ्र धोतर आणि फेटे घालून वारकऱ्यांचे रूप धारण केले होते, तर विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुगड्या घातल्या .
दिंडीमध्ये ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे अभंग आणि भजने गात विद्यार्थी सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर काहींनी पताका घेऊन वारकऱ्यांच्या दिंडीचे हुबेहूब प्रदर्शन केले. शाळेच्या परिसरातून निघालेली ही दिंडी शाहूनगर, दावणे गल्ली, सांगाव नाका, शिवाजी चौक, धनगर गल्ली, बापूसाहेब महाराज चौक, गैबी चौक, खर्डेकर चौक, हणबर गल्ली, पिष्टे गल्ली, रेल्वेलाईन, पसारेवाडी, काळम्मावाडी वसाहत मार्गे रामलिंग मंदिर समोर परत आली. आणि भक्तीमय रिंगण काढून भिंतीचा समारोप करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदाय आणि पर्यावरणाचे रक्षण याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि परंपरांची ओळख होते. यातून त्यांच्यात नैतिकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागते.
शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडीच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी स्वयंस्फूर्तीने या दिंडीत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली. ही दिंडी फक्त दूधगंगा विद्यालयाची न होता ती संपूर्ण कागलवासियांची झाली होती. तसेच सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक होण्यास मदत झाली, असे पालकांनी सांगितले.
विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने कागल शहर दुमदुमले.अनेक नागरिक मोठ्या भक्तीभावाने आपल्या लहान बालकांना पालखीसमोर काही क्षण ठेवत होते. दिंडीमध्ये कागल पोलिस ठाण्याचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवर आधारित गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले, त्याच बरोबर स्वामी समर्थ वि.मं कागल,श्री रामलिंग बालविकास मंदिर कागल, स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल व दूधगंगा विद्यालय (धरणग्रस्त वसाहत) कागल च्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा,सजिव देखावा तसेच समाज प्रबोधनपर व व्यसनमुक्तीवर आधारित फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची परंपरेची ओळख होते. यातून नैतिकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागते असे मत पालकांनी व्यक्त केले
या वारकरी दिंडीमध्ये दत्त भजनी मंडळ दावणे गल्ली,हनुमान भजनी मंडळ शाहूनगर व रामलिंग भजनी मंडळ काळम्मावाडी वसाहत कागल ही भजनी मंडळे तसेच माजी विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने वातावरण मंत्रमुग्ध केले . आज दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी विद्यार्थीनींना विविध सामाजिक संस्था ,अनेक मंडळे,पालक,माजी विद्यार्थी यांचेवतीने राजीगरा लाडू,केळी दूध व पाणी याचे वाटप केले.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दिंडीच्या शेवटी राहून कचरा एकत्र करून स्वच्छता केली याचे कागल शहरवासीयांनी कौतुक केले .
वारकरी दिंडीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे, स्वामी समर्थ विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व,स्व.गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पाटील व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





