नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्ञानसागर वाचनालयास पाच हजारांची देणगी देऊन सौ.मालती गोंडाळ यांनी साजरा केला वाढदिवस : अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या कल्पक उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ज्ञानसागर वाचनालयास पाच हजारांची देणगी देऊन सौ.मालती गोंडाळ यांनी साजरा केला वाढदिवस : अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या कल्पक उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्ञानसागर वाचनालयास पाच हजारांची देणगी देऊन सौ.मालती गोंडाळ यांनी साजरा केला वाढदिवस : अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या कल्पक उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
आजच्या बदल्यात जमान्यात केक कापून आणि जंगी पार्ट्याकरून वाढदिवस साजरे होत असताना या नव्या संस्कृतीला छेद देत सौ.मालती भानू गोंडाळ यांनी आपल्याच शीळ (ता.राजापूर जि.रत्नागिरी) गावातील ज्ञानसागर वाचनालयाला पाच हजार रुपये देणगी देऊन आपला ४२ वा वाढदिवस साजरा केला.
या देणगीचा धनादेश ज्ञानसागर वाचनालयाचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ यांच्या हाती सुपूर्द केला. यावेळी सचिव संतोष मोंडे, संचालक राजेंद्र बाईत, बी.के.गोंडाळ, लिपिक संतोष गोंडाळ उपस्थित होते.
पाच हजार रुपये ही रक्कम वाचनालयाच्या नावे बँकेत कायमस्वरूपी ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. या रक्कमेच्या व्याजातून वाचन प्रेरणा दिनी वर्षभरात सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या एका सभासद वाचकास शीळ गावचे माजी सरपंच ‘कै.श्री.केरु तानाजी गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सामान्य वाचकांसाठी ग्रंथालय चळवळ उभी करणाऱ्या अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930