नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यातील सर्व शाळांत ‘सखी सावित्री समिती’ एका महिन्यात स्थापन करावी : शालेय शिक्षण मंत्री नाम.दीपक केसरकर यांचे निर्देश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्यातील सर्व शाळांत ‘सखी सावित्री समिती’ एका महिन्यात स्थापन करावी : शालेय शिक्षण मंत्री नाम.दीपक केसरकर यांचे निर्देश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यातील सर्व शाळांत ‘सखी सावित्री समिती’ एका महिन्यात स्थापन करावी : शालेय शिक्षण मंत्री नाम.दीपक केसरकर यांचे निर्देश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील सर्व शाळांत मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप आणि व समतामूलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री समिती’महिन्यात स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांत या समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नाम.दीपक केसरकर यांनी दिले.
राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी या अनुषंगाने नाम.केसरकर यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसचिव समीर सावंत, मुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याचबरोबर त्यांची सुरक्षा, शाळेमधील पोषक वातावरण, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचे समुपदेशन आदींसाठी शासनाने शाळा, केंद्र, तालुका अशा विविध पातळ्यांवर सखी सावित्री समिती स्थापनेबाबत १० मार्चला परिपत्रक जारी केले आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येऊन जेथे समिती कार्यरत नसेल, तेथे एका महिन्यात समिती स्थापनेचे निर्देश शिक्षणमंत्री नाम. दिपक केसरकर यांनी दिले. पालकांमध्येही याबाबत जागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
शाळेत समतामूलक वातावरण राहील, यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवले जावेत. निकोप वातावरण निर्मिती करावी. तसेच अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत असलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘चिराग’ ॲपची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असेही नाम.केसरकर यांनी सांगितले.
शाळास्तर सखी सावित्री समिती रचना अशी आहे.
१. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- अध्यक्ष
२. शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी – सदस्य
३. समुपदेशक – सदस्य
४. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी) -सदस्य
५. अंगणवाडी रोविका- सदस्य
६. पोलीस पाटील – सदस्य
७. ग्रामपंचायत सदस्य (महिला प्रतिनिधी) -सदस्य
८. पालक (महिला प्रतिनिधी) -सदस्य
९. शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थीनी व २ विद्यार्थी) -सदस्य
१०. शाळेचे मुख्याध्यापक – सदस्य सचिव
शाळास्तर सखी सावित्री समितीची कार्ये अशी
१) आपल्या कार्यक्षेत्रातील १००% मुला-मुलींची (दिव्यांग विद्यार्थी) पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी / बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे.
२) स्थलांतरीत पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे.
३) विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौध्दिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे. सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
(४) मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे.
५) मुला-मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे. मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
६) मुला मुलीसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिविर समुपदेशन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
७) आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे.
८) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.
९) विविध कारणांमुळे मुला-मुलींचा होणारा अध्ययन हास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.
१०) शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे. विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे. अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा POCSO अंतर्गत असलेल्या ई-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या CHIRAG या app ची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे.
११) समितीच्या महिन्यातून १ वेळा (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठका आयोजित कराव्यात. सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात, जेणे करून गुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
१२) शाळास्तर समिती बैठकाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा. केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
१३) सदर समित्यांचे फलक शाळेच्या/कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत. आदी कार्यें करावयाची आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930