नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : माजी कृषीमंत्री, खास.शरद पवार दीपावलीनिमित्त आ.आसगावकर यांनी खास.शरद पवार यांना दिल्या शुभेच्छा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : माजी कृषीमंत्री, खास.शरद पवार दीपावलीनिमित्त आ.आसगावकर यांनी खास.शरद पवार यांना दिल्या शुभेच्छा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : माजी कृषीमंत्री, खास.शरद पवार
दीपावलीनिमित्त आ.आसगावकर यांनी खास.शरद पवार यांना दिल्या शुभेच्छा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, बारामती
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी अवघ्या तीन वर्षांतच मतदार संघातील साडेचार हजार शाळांना प्रिंटर, टिव्ही संच व पुस्तके देऊन शिक्षक आमदार कसा असावा हा आदर्श शिक्षण क्षेत्रात निर्माण केला ही बाब कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांनी काढले.
दीपावली सणानिमित्त देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांची गोंविदबाग (बारामती) येथील त्यांच्या निवासस्थानी आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खास.शरद पवार यांनी आमदार जयंत आसगावकर यांचेकडून मतदार संघातील केलेल्या कामाची माहिती व आढावा घेतला.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, जयंत आसगावकर यांनी शिक्षक आमदार कसा असावा हा आदर्श शिक्षण क्षेत्रात निर्माण केला, ही बाब कौतुकास्पद आहे, आपण विश्वास सार्थ ठरवला. आपले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवास्पद उद्गार‌ काढले.
याप्रसंगी खासदार शरद पवार यांनी आम. आसगावकर यांच्याबरोबर शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. नवीन शैक्षणिक धोरण व समस्या याबाबत माहिती घेत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य गणपतराव तावरे, संदीप पाथरे, सुदेश जाधव, श्रीधर गोंधळी, शिवाजीराव लोंढे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031