नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा.सुशांत मगदूम, उपाध्यक्षपदी दत्ता देशपांडे तर प्रमुख कार्यवाहपदी भीमराव पाटील यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा.सुशांत मगदूम, उपाध्यक्षपदी दत्ता देशपांडे तर प्रमुख कार्यवाहपदी भीमराव पाटील यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा.सुशांत मगदूम, उपाध्यक्षपदी दत्ता देशपांडे तर प्रमुख कार्यवाहपदी भीमराव पाटील यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रा.सुशांत तानाजीराव मगदूम (मुरगुड ता.कागल) यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय सखाराम देशपांडे यांची (जरळी ता. गडहिंग्लज) तर प्रमुख कार्यवाहपदी भीमराव महादेव पाटील (जेऊर ता. पन्हाळा) यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी हिंदुराव पाटील होते
कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संचालकांची नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष ग्रंथमित्र तानाजीराव मगदूम यांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजाची सुरुवात झाली.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार हिंदुराव पाटील व नारायण चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक रंगराव तोंडले, तात्यासो पाटील सुनील पवार यांनी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष सुशांत मगदूम यांनी सर्व संचालकांनी टाकलेला विश्वासास पात्र राहून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या अनेक समस्या जिल्हा संघाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया असे आवाहन केले.
उपाध्यक्ष दत्ता देशपांडे यांनी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ वाढीसाठी सामूहिक प्रयत्न करून शासनाचे धोरण, मिळणारे तुटपुंजे अनुदान, कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी व सेवा शर्ती याबाबत शासन दरबारी प्रश्न मांडूया असे सांगितले.
नूतन कार्यवाह भीमराव पाटील यांनी जिल्ह्याच्या ग्रंथालय चळवळीचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे ग्रंथ मित्र स्वर्गीय तानाजीराव मगदूम यांचे विचार पुढे नेऊन ही चळवळ सक्षम करूया अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी राजाराम सरनोबत, सर्जेराव पाटील, जयसिंग नाईक, गणपती चव्हाण, बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930