नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रा.डॉ.टी.एम.पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अँवॉर्ड प्रदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

प्रा.डॉ.टी.एम.पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अँवॉर्ड प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रा.डॉ.टी.एम.पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अँवॉर्ड प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड (ता.कागल) या महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.टी.एम.पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अँवॉर्ड २०२३ प्राप्त झाला असून डॉ. पाटील यांना पुणे येथे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु व महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.एन.पठाण यांचे हस्ते अँवॉर्ड समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रा.डॉ.टी.एम.पाटील यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार, युवा पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
यासाठी त्यांना जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, खासदार प्रा. संजय मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, प्रा. संभाजी अंगज यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा.डॉ. उदय शिंदे व गोरख साठे यांचे सहकार्य लाभले. प्रा.डॉ. पाटील यांचे अनेक शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांशी निकटचे संबंध आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930