नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जवाहर हायस्कूल, निळपण येथे २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार : सर्व शाळांनी सहभागी होण्याचे गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांचे आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जवाहर हायस्कूल, निळपण येथे २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार : सर्व शाळांनी सहभागी होण्याचे गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांचे आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जवाहर हायस्कूल, निळपण येथे २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार : सर्व शाळांनी सहभागी होण्याचे गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जवाहर हायस्कूल, निळपण या शाळेत गुरुवार दि.२१ डिसेंबर ते शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार असून तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांनी केले आहे.
श्री.उदाजीराव अध्यापक विद्यालय, गारगोटी येथे विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनासाठी माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख यांची सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार २१ डिसेंबर रोजी स.११ वा. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून समारोप शनिवार २३ डिसेंबर रोजी दु.३ वा. होणार आहे. यावेळी आकार फौंडेशन, सांगलीचे संस्थापक, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ प्रा.डॉ. प्रदीप पाटील यांचे ‘चला मुलांना विचार करायला शिकवूया’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ (Science & Tecnology for Society) असा आहे. या मुख्य विषयाला अनुसरून आरोग्य, जीवन, शेती, दळणवळण आणि वाहतुक, संगणकीय विचार आदी उपविषय निश्चित करण्यात आले आहेत.
विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक स्तर – (इ.६ ते ८वी) व माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इ.९ ते १२वी) असे दोन गट असून प्रत्येक गटातून तीन प्रदर्शनीय साहित्याची निवड केली जाणार आहे.
अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षक (इ.९ वी ते १२ वी) व प्राथमिक शिक्षक (इ.१ ली ते ८ वी) असे दोन गट असून प्रत्येक गटातून एका शैक्षणिक साहित्याची निवड जिल्हास्तरासाठी केली जाणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर यांच्या प्रायोगिक साधनाच्या प्रदर्शनातून एका उत्कृष्ट साधनाची निवड केली जाणार आहे.
या प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य, साधने याची पुनरावृत्ती होणार नाही व इन्स्पाअर ॲवॉर्ड मध्ये सहभागी झालेली साधने प्रदर्शनामध्ये सहभागी होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना श्री. मेंगाणे यांनी दिल्या.
विज्ञान प्रदर्शनाबरोबर ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले जाणार असून ग्रंथमहोत्सवात बाल विज्ञान साहित्य, शाळेच्या ग्रंथालयातील निवडक वाचनीय पुस्तके ग्रंथ महोत्सवात मांडली जाणार आहेत.
यावेळी गत प्रदर्शनाच्या खर्चाचा आढावा श्री. प्रकाश सांडूगडे यांनी घेतला. विज्ञान प्रदर्शनातील उपकरणे व प्रदर्शनाबाबत अन्य माहिती श्री. राहुल फुटाणे यांनी दिली. या बैठकीस कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एस.पाटील, शिक्षक नेते आनंदराव जाधव, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक बबन इंदुलकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, केंद्रप्रमुख संजय कुकडे, शिक्षकेत्तर संघटनेचे राजेंद्र साळोखे यांच्यासह तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930