नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही.पी. फुलतांबकर यांची सपत्नीक ‘मेन राजाराम’ला सदिच्छा भेट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही.पी. फुलतांबकर यांची सपत्नीक ‘मेन राजाराम’ला सदिच्छा भेट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही.पी. फुलतांबकर यांची सपत्नीक ‘मेन राजाराम’ला सदिच्छा भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही.पी.फुलतांबकर यांनी आज कोल्हापूर मधील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या जिल्हा परिषद शाळेस सदिच्छा भेट दिली.
यावेळी श्री.फुलतांबकर यांनी परशुराम विद्यालय गगनबावडा, राजर्षी शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर, एम.आर.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज व मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या चार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक कार्यकारिणी सभेत शिक्षक भरती, शिक्षकांना रितसर बढती, पदोन्नती, डीसीपीएस, एनपीएस, जुनी पेन्शन, बदली धोरण राज्यस्तरीय माध्यमिक शिक्षक अधिवेशन या संबंधी शिक्षकांच्या असणाऱ्या अडचणींचा उहापोह करण्यात आला.
संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही.पी.फुलतांबकर (जि.हिंगोली) यांनी शाळेचा ऐतिहासिक वारसा, शैक्षणिक सामाजिक कार्य पाहून समाधान व्यक्त केले. शिक्षकांच्या अडचणी, समस्या विधायक मार्गाने सोडविण्यासाठी सदैव कार्यशील असेन असे त्यांनी सूचित केले.
यावेळी बोलताना प्राचार्य विजय डोणे यांनी संघटनेमुळे सर्व जण एकत्र आल्याने बळ मिळाले. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सदैव कटिबध्द राहू अशी प्रतिक्रिया दिली.
याप्रसंगी श्री.व्ही.पी.फुलतांबकर व त्यांची पत्नी सौ.शोभा फुलतांबकर यांचे स्वागत शाल, महालक्ष्मी ची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन देऊन करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ.गजानन खाडे यांनी केले. प्रा,विकास पाटील, संतोष सणगर, हर्षवर्धन काटकर, शबाना शेख, सुषमा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बाबुराव यादव, भाऊसाहेब धराडे, सपना माने, अयोध्या धुमाळ, दीपा लोहार, श्री खर्डे, आर.जे. मुल्ला, सौ.पठाण, सौ.पत्रावळे, प्रिया पुजारी, संगिता चव्हाण, सचिन चव्हाण, प्रफुल्ल कदम, निलेश साळुंखे उपस्थित होते.
सूत्रसंचालन कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाबासो माळवे यांनी सूत्रसंचालन व राहूल देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930