नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जनस्वास्थ्य अभियानाचे मेन राजाराम हायस्कूल येथे प्रातिनिधिक उद्घघाटन : जनस्वास्थ्य प्रतिज्ञेने अभियानाची सुरुवात – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जनस्वास्थ्य अभियानाचे मेन राजाराम हायस्कूल येथे प्रातिनिधिक उद्घघाटन : जनस्वास्थ्य प्रतिज्ञेने अभियानाची सुरुवात

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जनस्वास्थ्य अभियानाचे मेन राजाराम हायस्कूल येथे प्रातिनिधिक उद्घघाटन : जनस्वास्थ्य प्रतिज्ञेने अभियानाची सुरुवात

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
आरोग्य व पर्यावरण जागृतीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ८०० माध्यमिक शाळातून दि. १ ते ५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जनस्वास्थ्य अभियानाचे प्रातिनिधिक उद्घघाटन कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूलमध्ये करण्यात आले. जनस्वास्थ्य प्रतिज्ञेने अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कोठेही कचरा करणार नाही, थुंकणार नाही, प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळेन, ध्वनी प्रदूषण करणारे डॉल्बी व फटाके यापासून दूर राहीन, तसेच गुटखा, तंबाखू, धूम्रपान आणि दारू सारख्या व्यसनी पदार्थांपासून दूर राहीन अशा प्रकारची जनसास्थ्य प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी बोलताना जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तरच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. अन्यथा भावी तरुण पिढी धोक्यात येणार आहे. प्रारंभी प्रास्ताविक जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्यवाह बृहस्पती शिंदे यांनी तर आभार बी.टी.यादव यांनी मानले. यावेळी प्राचार्य व्ही.बी.ढोणे, अलका देवलापूरकर, मिली देवलापूरकर, वैशाली पुंदीकर, पठाण मॅडम व पत्रावळे मॅडम उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930