नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना ‘उत्तम वाचक’ पुरस्कार प्रदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना ‘उत्तम वाचक’ पुरस्कार प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना ‘उत्तम वाचक’ पुरस्कार प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर तालुक्यातील ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना ‘उत्तम वाचक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ओणी येथे पार पडलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.उत्तम कांबळे, उदघाटन साहित्यिक प्रा.दि.बा.पाटील उपस्थित होते
बी.के.गोंडाळ हे राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयात गेली पंचवीस वर्षे शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षक, आजचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.राजन गवस यांच्या विचारप्रेरनेने, बालसाहित्यक मदन हजेरी, प्रा.विनोद मिरगुले यांच्या मार्गदर्शनाने गोंडाळ यांनी आपल्या शीळ गावात २५ मार्च १९९६ रोजी तेथील बालमित्रांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने ज्ञानसागर वाचनालय सुरू केले. हे वाचनालय सध्या ‘ब’ वर्गात असून स्वतंत्र प्रशस्त इमारत असलेले ग्रामीण भागातील वाचनालय आहे. ही त्यांच्या ग्रंथालयीन कामाची पहिली सुरुवात.त्यानंतर त्यांनी राजापूर तालुका ग्रंथालय संघ, जिल्हा ग्रंथालय संघ यामध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतः राजापूर तालुक्याचा ग्रामीण भागात आई कै सावित्री केरु गोंडाळ,चुलती कै यशोदा हरी गोंडाळ, कै सुमित्रा खेमाजी गोंडाळ, वडील कै. केरु तानाजी गोंडाळ स्मृती,अकरा (११) वाचनालये, एक विश्वकोश दालन, जुवाठी येथे अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र उभे केले.
आपल्या जुवाठी माध्यमिक विद्यालयात रद्दीतून ग्रंथालय, प्रत्येक वर्गात ग्रंथालय, वृत्तपत्र वाचन कट्टा आदी ग्रंथालयीन उपक्रम सुरू केले. तसेच आई कै.सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार, नगर वाचनालय राजापूर, माध्यमिक विद्यालय जुवाठी, ज्ञानसागर वाचनालय शीळ येथे सुरू केला. तसेच आपल्या ग्रंथभेट या उपक्रमात ३३८ प्राथमिक शाळेत श्यामची आई पुस्तक भेट व जुवाठीच्या प्रत्येक घरात श्यामची आई पुस्तक वाचन उपक्रम घेतला. त्याचबरोबर राजापूर तालुक्यातील शिक्षक, संस्था, शाळा, यांना आपल्या वैचारीक शिवजयंती या उपक्रमांमध्ये एक हजार पुस्तकाचे मोफत वाटप,विधवामातांच्या सोबतच्या हळदीकुंकू कार्यक्रमात प-पाळीचा या प्रबोधनात्मक पुस्तकाच्या शंभर पुस्तकांच्या प्रती मोफत वाटण्यात आल्या.
कुठल्याही शुभप्रसंगी, लग्न, वाढदिवस या कार्यक्रमाला पुस्तकच भेट देत, स्वतः वाचत, दुसऱ्यानाही वाचायला लावणाऱ्या, पुस्तकवेड्या बी.के.गोंडाळ यांचा उत्तम वाचक पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930