नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , युवा दिनानिमित्त ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सामुदायिक वाचन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

युवा दिनानिमित्त ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सामुदायिक वाचन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

युवा दिनानिमित्त ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सामुदायिक वाचन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
युवा दिनानिमित्त कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी दिलेल्या संदेश पत्रकाचे वाचन करण्यात आले.
सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आलेल्या एका विशेष पत्राची मोठी चर्चा आहे. ते पत्र पाठविलय थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक शाळा सुंदर व्हावी यासाठी ४५ दिवसांचे विशेष अभियान राबविले जात आहे. याच अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहन करणारे हे पत्र आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा… सुंदर शाळा’ हे अभियान १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत यात शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. हेच अभियान विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी करावे, याचे मार्गदर्शन-आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठविले आहे. असच पत्र कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात आल. आज शासकीय उपक्रम युथ दिनानिमित्त प्रायव्हेट हायस्कूमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्राच वाचन करण्यात आलं.
शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत आदर व उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात यशस्वी होणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिके दोन लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला एक लाख रुपये असून जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिके ११ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये आहे. तसेच विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिके २१ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके ११ लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला सात लाख रुपये आहे. राज्यस्तरावर ५१ लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिके व द्वितीय आलेल्या शाळांना २१ लाख रुपये तर तृतीय ११ लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930