नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालय, कडगांवच्या विद्यार्थ्यांची गोवा सायन्स सेंटरला भेट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालय, कडगांवच्या विद्यार्थ्यांची गोवा सायन्स सेंटरला भेट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.आनंदराव आबिटकर महाविद्यालय, कडगांवच्या विद्यार्थ्यांची गोवा सायन्स सेंटरला भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगांव
येथील श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोवा सायन्स सेंटरला भेट दिली. गोवा विज्ञान केंद्र आणि तारांगण हे विज्ञान अणि तंत्रज्ञानातील शिक्षणाचे ठिकाण म्हणून विकसित केलेले आहे. वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे आणि विज्ञानाचा उत्साह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट ठेवून आबिटकर महाविद्यालयाने गोवा विज्ञान केंद्रास भेट दिली.
यावेळी वि‌द्यार्थ्यांनी विज्ञान केंद्रातील उपकरणे स्वतः चालवली, स्वतः हाताळली आणि रोमांचक विज्ञान घटकांचे साक्षीदार झाले. जलचर प्राण्यांबद्दल जिज्ञासा निर्माण होण्यासाठी 3D फिल्म दाखविण्यात आली.
सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उपकरणांची माहिती घेतली. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या दौऱ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे प्रोत्साहन व प्राचार्य गुरूप्रसाद शेणवी यांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930