नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रलंबित शालार्थ आयडी व संच मान्यता दुरुस्तीसाठी कॅम्प घेऊन प्रश्न कायमचा निकाली काढणार : शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

प्रलंबित शालार्थ आयडी व संच मान्यता दुरुस्तीसाठी कॅम्प घेऊन प्रश्न कायमचा निकाली काढणार : शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रलंबित शालार्थ आयडी व संच मान्यता दुरुस्तीसाठी कॅम्प घेऊन प्रश्न कायमचा निकाली काढणार : शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती
आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
पुणे व सोलापूर जिल्ह्यातील नव्याने घोषित २० टक्क्यावरील शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यासाठी व संच मान्यता दुरुस्तीसाठी लवकरच कॅम्प घेणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त श्री.सुरज मांढरे यांनी दिली. आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील बरेच शिक्षक शालार्थ आयडीपासून वंचित राहिलेले आहेत. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शालार्थ आयडीचा प्रश्न प्रलंबित आहे. हा निधी अखर्चिक असल्याने मंत्री महोदयांनी देखील पुढील टप्पा देण्यास नकार दिलेला आहे. याचा गांभीर्याने विचार करावा असे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले. आयुक्त मांढरे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत शालार्थ आयडी व संच मान्यता दुरुस्तीसाठी कॅम्प घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात येईल असे सांगितले. कॅम्पची प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याच्या सूचना सहसंचालक हारुन आत्तार यांना दिल्या.
याशिवाय शिक्षकेतर आकृतीबंध व पदोन्नती यावरही सकारात्मक चर्चा झाली. यानंतर आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा केली. त्यांनीही याबाबतीत सकारात्मकता दाखवली. यावेळी शिवाजी खांडेकर, सुभाष माने, आण्णासाहेब गायकवाड, शरदचंद्र धारूरकर, दादासाहेब गवारे, गणपतराव तावरे, विजय जाधव, श्रीधर गोंधळी, श्री.बेहेरे, दिलीप डोंगरे, आशुतोष पोवार आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930