नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कु.आर्या पाटील हिने विभागीय स्केटिंग स्पर्धेत पटकावली तीन सुवर्णपदके : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कु.आर्या पाटील हिने विभागीय स्केटिंग स्पर्धेत पटकावली तीन सुवर्णपदके : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कु.आर्या पाटील हिने विभागीय स्केटिंग स्पर्धेत पटकावली तीन सुवर्णपदके : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे विज्ञान शाखेत शिकणारी कु आर्या अरूण पाटील हिची शालेय रोलर स्केटिंग विभागीय स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदक मिळवून शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा स्पर्धेतही दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे.‌
कु.आर्या हिस लहानपणापासून स्केटिंग खेळाची आवड होती. मोबाईल, टी. व्ही., संगणक यामध्ये वेळ न घालवता शालेय अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनावर भर देत आहे. तसेच रोज दोन तास मैदानावर, रोडवर वर्क आऊट, स्केटिंग सराव करत आहे. यापुर्वीही ती पुणे, सांगली, सातारा, नागपूर महाराष्ट्राबरोबर बंगळूर, कर्नाटक, गुजरात राज्यात आपल्या खेळाची चुणूक दाखवत १६० वर सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र संपादन केली आहेत. खेळाबरोबर सहशालेय निबंध, वकृत्व, चित्रकला, घोषवाक्य, चर्चासत्र, कार्यशाळेत हिरीरीने सहभागी होत आहे.
योग्य नियोजन, प्रचंड कष्ट, मेहनत व चिकाटीच्या जोरावर तिची शालेय विभागीय स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा विरार मुंबई येथे ३१ जानेवारी, १ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.
कु.आर्या हिस जिल्हा परिषद, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्राचार्य विजय डोणे, उपप्राचार्य डॉ.गजानन खाडे, क्रीडा शिक्षक बाबासो माळवे, वर्गशिक्षक सपना माने, प्रशिक्षक जयराम जाधव, अजितसिंग शिलेदार, असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.महेश कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930