नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आमदार ऋतुराज पाटील यांनी २५२ युवक-युवतींसमवेत केला रांगणा किल्ला ट्रेक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आमदार ऋतुराज पाटील यांनी २५२ युवक-युवतींसमवेत केला रांगणा किल्ला ट्रेक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आमदार ऋतुराज पाटील यांनी २५२ युवक-युवतींसमवेत केला रांगणा किल्ला ट्रेक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसमवेत रांगणा किल्ला ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये मतदार संघातील २५२ युवक युवती सहभागी झाले होते. यामध्ये ४४ युवतींचा समावेश होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील हा ट्रेक सहभागी युवा पिढीला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची प्रेरणा देणारा ठरला. सह्याद्रीच्या डोंगररांगात उभ्या असलेल्या दुर्गम किल्यांची जपणूक करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे मत आम.ऋतुराज पाटील यांचे व्यक्त केले.
या ट्रेकची सुरुवात आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करुन झाली. तांब्याचीवाडी, भटवाडी, चिक्केवाडी या मार्गावरुन रांगणा किल्यापर्यंत हा ट्रेक झाला. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील झाडे-झुडपे तसेच चढ-उतार यातून कडक उन्हामध्ये मार्ग क्रमण करताना सहभागी युवक युवती घामाच्या धारांमध्ये न्हावून निघाल्या. तरुणाईने सळसळत्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांचा जयघोष केला. हा जयघोष सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दुमदुमला.
शिवभक्तीच्या गाण्यांनी एक वेगळीच उर्जा सहभागी युवापिढीच्या अंगात संचारली. आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह युवापिढीला हा अनुभव उर्जा देणारा ठरला. या ट्रेकच्या मार्गावर आमदार ऋतुराज पाटील यांनी चिक्केवाडी येथील शिंदे कुटूंबियांशी आपुलकीने संवाद साधला.
आमदार पाटील यांच्या हस्ते विधीवत गड पुजन होताना सहभागी तरुणाईने शिवछत्रपतींचा जयघोष केला. रांगणा किल्ला येथे श्री रांगणाई देवीचे आमदार पाटील यांनी दर्शन घेतले. त्यानंतर सहभागी ट्रेकर्स बरोबर जेवणही घेतले. या संपूर्ण ट्रेकमध्ये आमदार पाटील यांनी युवक-युवतींशी साधलेल्या आपुलकीच्या दिलखुलास संवादाने सर्वजण भारावून गेले. इतिहास अभ्यासक राम यादव यांनी रांगणा किल्यावरील वाड्यामध्ये किल्ल्याची माहिती व इतिहास सांगितला.
आमदार ऋतुराज पाटील युवक-युवतींशी संवाद साधताना म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या शौर्याची, साहसाची साक्ष देत सह्याद्रीच्या डोंगररांगात उभ्या असणाऱ्या दुर्गम किल्यांची जपणूक करणे हे आपली सर्वांचे कर्तव्य आहे. रांगणा किल्ला ट्रेक हा ऊर्जादायी अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाज्ञा गडकोट संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले. गडाच्या परिसरात कचरा होऊ नये याची काळजी सहभागी ट्रेकर्सनी घेतली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930