नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्येष्ठ नागरिक संस्थेचा ‘भुदरगड भूषण’ पुरस्कार माजी आमदार श्री.बजरंग देसाई (आण्णा) यांना तर ‘आदर्श माता’ पुरस्कार श्रीमती नलिनी देसाई यांना २५ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ज्येष्ठ नागरिक संस्थेचा ‘भुदरगड भूषण’ पुरस्कार माजी आमदार श्री.बजरंग देसाई (आण्णा) यांना तर ‘आदर्श माता’ पुरस्कार श्रीमती नलिनी देसाई यांना २५ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्येष्ठ नागरिक संस्थेचा ‘भुदरगड भूषण’ पुरस्कार माजी आमदार श्री.बजरंग देसाई (आण्णा) यांना तर ‘आदर्श माता’ पुरस्कार श्रीमती नलिनी देसाई यांना २५ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा ‘भुदरगड भूषण’ पुरस्कार माजी आमदार श्री.बजरंग आनंदराव देसाई (आण्णा) यांना तर ‘आदर्श माता’ पुरस्कार श्रीमती नलिनी काकासाहेब देसाई (म्हसवे) यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.एम.आर. टिपुगडे व सचिव श्री.बी.एस.माने यांनी दिली.
भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळा श्री.मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते तर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार २५ फेब्रुवारी रोजी स.१०.३० वा. तुलसी लॉन मंगल कार्यालय, खानापूर येथे संपन्न होणार आहे.
यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार के.पी.पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. बाबुराव सर्जेराव देसाई, भुदरगड तालुका शेतकरी संघाचे चेअरमन प्रा.बाळ देसाई, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. राहुल देसाई, श्री. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा), बिद्री कारखान्याचे माजी संचालक श्री. के. जी. नांदेकर, गारगोटीचे सरपंच श्री. प्रकाश वास्कर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. शामराव देसाई, भाजपचे जिल्हा संघटक श्री. नाथाजी तुकाराम पाटील, गारगोटीचे उपसरपंच श्री. सागर शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.एम.आर. टिपुगडे, उपाध्यक्ष श्री.ए.के. देसाई, सचिव श्री.बी.एस.माने, खजानीस श्री.बी.ए.सदलगे यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031