जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी गृहिणीनीं आरोग्याची हेळसांड करु नये : डाॕ. चंद्रकांत परुळेकर
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी गृहिणीनीं आरोग्याची हेळसांड करु नये : डाॕ. चंद्रकांत परुळेकर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
महिलांनी कुटुंबासाठी झिजतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी गृहिणीनीं आरोग्याची हेळसांड करु नये.आपण जे पिकवतो ते सत्वयुक्त आहे काय? याची खात्री करुन आपल्या कुटुंबाला सत्वयुक्त आहार द्यावा, असे आवाहन पिंपळगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॕ. चंद्रकांत परुळेकर यांनी केले. मुरुक्टे ता.भुदरगड येथे महिला आरोग्य जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. उपसरपंच दयानंद ऱ्हाटवळ अध्यक्षस्थानी होते.
आनंदी महिला ग्राम संघ, ग्रामपंचायत मुरुक्टे यांनी आरोग्य जागृती अभियान घेतले. स्वागत प्रास्ताविक संजिवनी ऱ्हाटवळ यांनी केले. गिता खोचारे यांनी सुत्रसंचालन केले. संद्या भांडवलकर यांनी प्रार्थना सादर केली. यावेळी गावातील सर्व स्वयंसहाय्यता समुहाच्या महिला उपस्थित होत्या. सुनिता गुरव यांनी आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





