नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अभ्यासक्रम अंदाजपत्रक शिबिर आदर्श गुरुकुल, पेठवडगाव येथे संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अभ्यासक्रम अंदाजपत्रक शिबिर आदर्श गुरुकुल, पेठवडगाव येथे संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अभ्यासक्रम अंदाजपत्रक शिबिर आदर्श गुरुकुल, पेठवडगाव येथे संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पेठवडगाव
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षातील अभ्यास अंदाजपत्रक शिबिर आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे संपन्न झाले. शिबिराचे उदघाटन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते व कोजीमाशीचे तज्ज्ञ संचालक, शिक्षक नेते दादा लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, संघाचे माजी चेअरमन सुरेश संकपाळ, कायम विनानुदानित शाळा समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सौ.सविता पाटील, आर. बी.नांगरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्याकरिता विविध आंदोलनाच्या माध्यमातून मुख्याध्यापक संघासह प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षक नेते दादा लाड यांनी सर्व तज्ञ शिक्षकांनी अभ्यास अंदाजपत्रक तयार करताना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी मुख्याध्यापक संघाने शिक्षण क्षेत्रावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन केले. मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन सुरेश संकपाळ यांनी मुख्याध्यापक संघाने अभ्यासक्रम निश्चित करताना नवीन शैक्षणिक धोरणातील बदल लक्षात घेऊन तो तयार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार यांनी मुख्याध्यापक संघ राज्यात आदर्शवत काम करेल. त्यासाठी आम्ही तज्ञ शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत या शैक्षणिक वर्षात नवीन उपक्रमांचे आयोजन करत आहोत असे प्रतिपादन केले.
संघाचे सचिव आर.वाय.पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा व गोपनीयता याकरीता यावर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांकरिता व बाहेरील जिल्ह्यांकरिता वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाईल व संघाला पूर्व वैभव प्राप्त करून देण्याकरिता प्रयत्न केले जातील.
यावेळी विविध विषयांच्या तज्ञ शिक्षकांनी शैक्षणिक वर्ष २०२४ – २०२५ या वर्षातील वार्षिक अभ्यासक्रम अंदाजपत्रक तयार करून मुख्याध्यापक संघाकडे सुपूर्द केला. प्रारंभी स्वागत डॉ.डी.एस.घुगरे यांनी तर आभार मुख्याध्यापक संघाचे विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी मानले. सूत्रसंचालन शिवाजी पाटील, सौ.बाबर व सौ.शिखरे यांनी केले
यावेळी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव श्रीकांत पाटील खजानिस सागर चुडाप्पा, माजी सहसचिव अजित रणदिवे, माजी लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, के. के. पाटील, उदय पाटील, कोजीमाशीचे संचालक दीपक पाटील, मनोहर पाटील, आर.डी.पाटील, पी. डी. शिंदे, संजय पाटील, अर्जुन होणगेकर, आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.महानंदा घुगरे यांच्यासह
मुख्याध्यापक संघाचे संचालक श्री.जयसिंग पाटील, श्री.रामचंद्र शिंदे, श्री.संजय देवेकर, श्री.सुनील पाटील, श्री.पांडुरंग भारमल, श्री.निशिकांत चव्हाण, श्री.गणपती पाटील, श्री.आनंदा वारंग, श्री.माजीद पटेल, श्री.हेमंत धनवडे, श्री.एस. के.पाटील, श्री.युवराज पाटील, श्री.बसवराज वस्त्रद, श्री.महादेव पाटील, श्री.दामोदर यरुडकर, सौ.मनीषा यादव, सौ.हर्षदा गोसावी, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031