नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बळीराजा करिअर ॲकॅडमीचे कार्य कौस्तुकास्पद : आमदार प्रकाश आबिटकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बळीराजा करिअर ॲकॅडमीचे कार्य कौस्तुकास्पद : आमदार प्रकाश आबिटकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बळीराजा करिअर ॲकॅडमीचे कार्य कौस्तुकास्पद : आमदार प्रकाश आबिटकर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मुलांना सैन्य व पोलीस दल तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी बळीराजा करिअर ॲकॅडमीचे कार्य कौस्तुकास्पद आहे, असे गौरवोदगार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले.
बळीराजा फौउंडेशन संचलित, बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गंगापूर येथे ॲकॅडमी मध्ये आठ वर्षे अध्यापनासाठी कार्यरत असणाऱ्या व सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पदी नियुक्त झालेल्या श्री.सचिन केणे, श्री. निखिल शिंदे व श्री.सौरभ खोत, तसेच वनरक्षक, इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री.अजित जाधव पाटील होते. यावेळी अध्यक्षा केतकी जाधव – पाटील मॅडम, महेश काकडे, जनार्दन पाटील, सयाजी पाटील, सातापा ढेकळे, सागर पवार, दिगंबर कल्याणकर, उदय हुंडेकर, संजय पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश अबिटकर म्हणाले की, अवघ्या १२ वर्षात ६९१ मुले भरती करणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच अकॅडमी असेल. येत्या काही दिवसात इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये यशस्वी होणारी विद्यार्थी संख्या याही पेक्षा अधिक असेल आणि नावाप्रमाणेच ही संख्या इंटरनॅशनल लेवलला पोहोचेल.
प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य अमित साठे यांनी, सूत्रसंचालन प्रा. दयाली पाटील यांनी केले तर आभार प्रा. अमोल पाटील यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930