नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , समाज प्रबोधन काळाची गरज : प्रा.डॉ.जालंधर पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

समाज प्रबोधन काळाची गरज : प्रा.डॉ.जालंधर पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

समाज प्रबोधन काळाची गरज : प्रा.डॉ.जालंधर पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मिणचे खुर्द
आपला आदर्श कोण असावा हे विचारपूर्वक ठरवण्याची गरज असून समाज प्रबोधन काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.जालंदर पाटील यांनी केले.
मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील ग्रामदैवत श्री. काळम्मा देवीच्या यात्रेनिमित्त व बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती व शक्तीचा जागर झाल्यानंतर सरते शेवटी विचारांचा जागर मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या विचारपीठाच्या वतीने हे तिसरे विचार पुष्प आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.जालंदर पाटील यांचे व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. पाटील म्हणाले, काळासोबत आपले विचार परिवर्तन करणे किती महत्त्वाचे आहे ? आपला आदर्श कोण असावा, हे विचारपूर्वक ठरवण्याची गरज आहे यासह समाजातील स्वार्थी प्रवृत्तीमुळे समाज कसा पोखरला जात आहे ? हे विविध उदाहरण देऊन समजावून सांगितले. या प्रेरणादायी व्याख्यानातून गावातील बालक पालक व ग्रामस्थ यांना प्रबोधित करण्यात आले. यावेळी संध्या अभ्यासिका हा उपक्रम सुरू करणारे श्री सर्जेराव देसाई यांचाही मंचच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामदेवालयासाठी विशेष भेटवस्तू देणाऱ्या युवकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच जयश्री खेगडे, माजी जि.प.सदस्य आर.व्ही. देसाई, माजी सभापती आक्काताई नलवडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी बी नलवडे, उपसरपंच अरुण कांबळे, मंचचे अध्यक्ष डी.एस.देसाई आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सुभाष सोकासणे यांनी प्रास्ताविक शरद देसाई यांनी केले. प्रा.सुनील देसाई सर यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930