नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी येथे धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी येथे धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी येथे धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे वतीने भुदरगड व राधानगरी तालुक्यातील सार्वजनिक न्यासाच्या (संस्था) विश्वस्तांची कार्यशाळा कर्मवीर हिरे महाविद्यालय, श्री.मौनी विद्यापीठ, गारगोटी येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) होते. यावेळी धर्मादाय निरीक्षक महादेव जावळे व धर्मादाय निरीक्षक गणेश ढोकळे यांनी मार्गदर्शन केले.धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पोवार मॅडम यांच्या संकल्पनेतून सदरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी धर्मादाय निरीक्षक महादेव जावळे व गणेश ढोकळे यांचा मधुकर देसाई (आप्पा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना धर्मादाय निरीक्षक महादेव जावळे म्हणाले, सार्वजनिक न्यास नोंदणी संस्थांनी न्यासाचे कलम २२ मधील तरतुदीप्रमाणे बदल अर्ज दाखल करतानाच तात्पुरत्या मान्यतेसाठी स्वतंत्र अर्ज केल्यास मान्यता देण्याबाबत धर्मादाय आयुक्तांच्या परिपत्रक क्र.६०८/२०२४ अन्वये लवकरात लवकर मान्यता मिळू शकते.
श्री. जावळे यांनी धर्मादाय संस्था नोंदणी, त्यानंतर करावयाची कार्यवाही, बदल अर्ज, ऑडिट रिपोर्ट दाखल करणे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई म्हणाले, धर्मादाय कार्यालयाने संस्थांच्या विश्वस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करुन प्रबोधनाचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
यावेळी प्राचार्य जी. एस.म्हांगोरे यांच्यासह भुदरगड व राधानगरी या तालुक्यातील संस्थाचालक उपस्थित होते. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी केले. आभार श्री. शाहू वाचनालयाचे कार्यवाह टी. बी. पाटील यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031