नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरुक्टे येथे परसबाग निर्मितीसाठी महिलांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मुरुक्टे येथे परसबाग निर्मितीसाठी महिलांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुरुक्टे येथे परसबाग निर्मितीसाठी महिलांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
मुरुक्टे (ता.भुदरगड) येथील गृहलक्ष्मी स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना परसबाग करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत परसबाग निर्मितीसाठी ग्रामीण महिलांना प्रोत्साहन दिले जाते. पिंपळगाव प्रभाग समन्वयक अस्मिता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
खेड्यातील महिलांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी परसबागेतील वेगवेगळी ताजी भाजी उपयुक्त ठरते. लोह, कॕल्सिअम,
हिमोग्लोबीन कमतरता राहू नये यासाठी पालेभाज्या आहारात असणे गरजेचे आसल्याचे अस्मिता पाटील यांनी सांगितले. प्रत्यक्ष परसबागेचा आराखडा तयार करुन बीजरोपण करण्यात आले.परसबागेचे सात भाग करुन त्यामध्ये सात प्रकारच्या भाजी बियाण्याची पेरणी कराण्यात आली. यामुळे महिलांना दररोज वेगवेगळी पालेभाजी आहारात घेता येईल. परसबागेमुळे वेलवर्गीय भाज्या ,पालेभाज्या गटातील महिलांना सहज उपलब्ध होतील.यावेळी गट प्रेरिका गिता खोचारे, संजिवनी ऱ्हाटवळ, सुमन तोडकर, गिता पाटील, अमृता सुतार उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930