नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , १५ मार्चचा नवा संच मान्यता आदेश रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे भुदरगड, राधानगरी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळास आश्वासन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

१५ मार्चचा नवा संच मान्यता आदेश रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे भुदरगड, राधानगरी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळास आश्वासन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

१५ मार्चचा नवा संच मान्यता आदेश रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे भुदरगड, राधानगरी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळास आश्वासन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संच मान्यतेच्या जाचक व अन्यायकारक आदेशामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची पदे पदे कमी होणार असल्याने सदरचा आदेश रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन भुदरगड, राधानगरी तालुक्यातील मुख्याध्यापकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना दिले. यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी संच मान्यतेचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
१५ मार्च २०२४ चा नवा संच मान्यता आदेश शिक्षण क्षेत्र उध्वस्त करणारा आहे. या आदेशानुसार सन २०२४ – २५ ची संच मान्यता होणार आहे. यामुळे १५० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पदास मान्यता मिळणार नाही परिणामी अनेक शाळात मुख्याध्यापक असणार नाहीत. शाळेचे प्रशासन कोलमडून जाणार आहे. अनेक शाळातील शिक्षकांची पदेही कमी होणार आहेत. पटसंख्या कमी झाल्यास कला व क्रीडा शिक्षकांना मान्यता मिळणार नाही. पटसंख्या कमी असल्याचे कारण देऊन अनेक शाळा बंद केल्या जातील.
या धोरणामुळे वाड्या वत्यावरील शाळा बंद होतील परिणामी बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित रहातील. हा आदेश महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र संपवून टाकणार आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षण क्षेत्रात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे हा आदेश रद्द झाला नाही तर शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिनांक ६ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय विराट मोर्चा काढणार आहोत. या संदर्भातील निवेदन आमदार प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी १५ मार्चचा नवा संच मान्यता आदेश व त्यामुळे होणाऱ्या परिणामाची माहिती दिली. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, राधानगरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.पाटील, भुदरगडचे अध्यक्ष सुरेश पाटील, जयसिंग पोवार, डी.एस.ऐरुडकर, भुदरगड तालुका उपाध्यक्ष एस. के. कासार, सचिव अमर देसाई, प्रकाश पाटील, व्ही. आर. नलवडे, पी.एल.पाटील, एन.एम.पाटील, ए.एम.पाटील, एस एस पाटील, एम.बी.चौगले, एन.एस.सुतार, किशोर बरगे, व्ही.डी.पाटील, मुकुंद कुंभार, व्ही.डी.पाटील, सौ. पाडळकर, सौ.देसाई, ए.ए. पाटील, राजेंद्र कारंडे, श्री.बाईत यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930