नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात : कोल्हापूरमध्ये प्रचंड पावसातही आंदोलन सुरु – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात : कोल्हापूरमध्ये प्रचंड पावसातही आंदोलन सुरु

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात : कोल्हापूरमध्ये प्रचंड पावसातही आंदोलन सुरु

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानित कृती समितीच्या वतीने १ ऑगस्ट २०२४ पासून विविध मागण्यांसाठी कोल्हापूर उपसंचालक कार्यालय येथे धरणे आंदोलनास सुरवात झाली. यावेळी शिक्षकांनी मागण्या मान्य करण्यासंदर्भात घोषणा देत उपसंचालक कार्यालय दणाणून सोडले. वाढीव टप्प्याचा आदेश काढा व १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा आदेश रद्द करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. धरणे आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने दिनांक १२ जुलै २०१४ रोजी शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात जून २०१४ पासून वाढीव २० टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली. परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निषलेला नाही. शासनाने पुढील वाडीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावेत. व १५ मार्च २०२४ था जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासाठी १ ऑगस्ट पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या
अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता मन २०२३-२०२४ नुसार दि. १ जून २०२४ पासूनचा वाढीव टप्पा आदेश काढावा, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करावे,शेवटच्या वर्गाची पट संख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानितमध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात. या मागणीसाठी आज राज्यात सर्व ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031