नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षकांचे महालक्ष्मीला दंडवत घालून साकडे : उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित सर्व शाळा बंद – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षकांचे महालक्ष्मीला दंडवत घालून साकडे : उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित सर्व शाळा बंद

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षकांचे महालक्ष्मीला दंडवत घालून साकडे : उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित सर्व शाळा बंद

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वाढीव टप्प्याचा जीआर तात्काळ काढावा, १५ मार्चचा जाचक संच मान्यता आदेश रद्द करावा आदी विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीमार्फत अंशतः अनुदानित शिक्षकांचे कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. धरणे, घंटा थाळी नाद, मुंडन, भजन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. आज कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालय ते महालक्ष्मी मंदिर पर्यंत शिक्षकांनी दंडवत घालून महालक्ष्मीला साकडे घातले.
अनुदान आमच्या हक्काचे, आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देऊन कडकलक्ष्मीचा प्रतीकात्मक पेहराव करून, सरकारला जाग येण्यासाठी आसूड बडवीत कडकलक्ष्मीचा जागर करण्यात आला.
अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन २०२३-२०२४ नुसार दि. १ जून २०२४ पासूनचा वाढीव टप्पा अनुदान आदेश काढणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करणे, शेवटच्या वर्गाची पट संख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सुभाष खामकर, डी.एस.घुगरे, अनिल ल्हायकर, बी जी पाटील, संजय घराळे, यशराज गाडे, राजू भोरे, अरविंद पाटील भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, नेहा भुसारी यांचे सह कृतिसमितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला. महिला सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

उद्या शाळा बंद आंदोलन
आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी उद्या बुधवारी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता महामोर्चा काढून कृती समितीमार्फत सरकारला जागे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवन्यात येणार आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यातील ही शाळा बंद ठेवून शिक्षक मोर्चा उपस्थितीत लावणार असल्याची माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930