नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तोरस्कर सोशल फाउंडेशनच्या वतीने गंगापूर येथे माजी सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

तोरस्कर सोशल फाउंडेशनच्या वतीने गंगापूर येथे माजी सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

तोरस्कर सोशल फाउंडेशनच्या वतीने गंगापूर येथे माजी सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गंगापूर
कै.कमल वसंतराव तोरस्कर सोशल फाउंडेशन, गंगापूर (ता.भुदरगड) यांच्यावतीने कै.कमल वसंतराव तोरस्कर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त व २५ व्या कारगिल विजय दिनानिमित्त गंगापूर गावातील सर्व माजी सैनिकांचा व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचा सत्कार सोहळा व गावातील विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी वयोवृद्ध माजी पोलीस पाटील श्री.गणपतराव रामचंद्र पाटील होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील (बापू) होते.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्री पंडितराव केणे, पांडुरंग विविध संस्था मंचचे श्री.प्रकाशराव कुलकर्णी , कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष श्री.राहुल देसाई, बिद्रीचे माजी कामगार प्रतिनिधी श्री.भीमराव किल्लेदार, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस श्री. बाळासाहेब देवकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तानाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव, शिक्षक बँक माजी संचालक श्री.पी.जी.केणे, गंगापूर गावातील सर्व आजी माजी सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नी त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले यशस्वी विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य गंगापूर गावातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते त्याचबरोबर महिलावर्ग व तोरस्कर परिवार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार श्री.अजित तोरस्कर यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031